corona1 
पुणे

दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...

सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील मळद येथे सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील इतर सहा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोऱ्हाडे यांनी दिली.

मळद येथील 58 वर्षीय महिलेला व त्यांच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील आणखी सहा जणांचे स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील कोविड सेंटरमध्ये घशातील नमुने रविवारी (ता.  12) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी (ता. 13) उशिरा प्राप्त झाला. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह दोन्ही रुग्ण पुण्यातील नवले हाॅस्पिटल येथे उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या तरुणाच्या संपर्कातील आणखी दोन जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या ग्रामस्थांनी घरीच राहून सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे.  तसेच, रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोऱ्हाडे व मळदचे सरपंच दत्तात्रेय शेलार यांनी केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेला काही दिवसांपूर्वी कर्करोगाच्या तपासणीसाठी पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिक गेल्या होत्या. त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना पुण्यातीलच नवले हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कुटुंबातील इतर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे मळद ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, पुढील ५ दिवसांत वातावरणात होणार बदल, तुमच्या भागांत कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Migrant Woman Delivery: कागदपत्रे जळाली; पण माणुसकी राहिली जिवंत! कऱ्हाडला परप्रांतीय महिलेला मिळाली सुरक्षित प्रसूतीची मदत; नगरसेवकाच्या प्रयत्नांना यश..

Latest Marathi News Live Update : 'इंडिया एआय इम्पॅक्ट'चे आज उद्‌घाटन; मोदी साधणार जागतिक नेत्यांशी संवाद

Pune Accident Case : पुण्यातील पोर्श ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अश्फाक मकानदारला जामीन मंजूर

Mobile Range Issue : फोन करण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट; दीड महिन्यापासून बहुली गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर

SCROLL FOR NEXT