corona1 
पुणे

कोरोना साखळी तुटल्यामुळे दौंडमधील या गावाला मोठा दिलासा 

सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील मळद येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा व इतर दोन, अशा आठही जणांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

मळद येथील एक महिला पुण्यातील नवले हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केली होती. तेथे त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील सहा व्यक्तींची व इतर दोघांचे स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये घशातील नुमने घेण्यात आले होते. पहिले सहा व मंगळवारी ( ता. 14 ) आणखी दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामळे कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे मळद व परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

मात्र, दोन कोरोना रुग्ण अढळून आल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून  (ता. 14 )मळद व परिसरातील वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या सर्वांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, गावात ग्रामस्थांनी मास्क लावण्याच्या व सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या जाणाऱ्या नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच, गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय शेलार यांनी दिली.

Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT