corona  
पुणे

बाप रे, जुन्नरमधील कोरोनाबाधित वकिल अनेकांच्या संपर्कात 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून, शहराच्या मध्य वस्तीत एक गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या वकिलाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या  ३२ झाली असून, एकाचा मृत्यू, तर २१ रुग्ण बरे झाले असून, १० ऍक्टिव्ह आहेत.

कोरोना रुग्ण आढळलेला परिसर जुन्नर नगर पालिका प्रशासनाने प्रतिबंधीत करण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. तसेच, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती जळगाव येथे जाऊन आल्याचे सांगण्यात आले, येथे आल्यानंतर त्याचा अनेकांशी संपर्क झाला असून, त्यांची चिंता वाढली आहे.

जु्न्नर तालुक्यातील कुसुर आणि धामणखेल या गावांत बुधवारी (ता. १०) प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गुरुवारपर्यंत (ता. ११) तालुक्यातील २१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. औरंगपूर येथील एकाचा मृत्यू झाला आहे. या दहा ऍक्टिव्ह रुग्णांपैकी लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये चार, पुण्याच्या औंधला दोन वायसीएम येथे तीन, तर रुबी हॉल येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.

लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी आठ संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले, ते निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३५६ रुग्णांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम बनकर यांच्या देखरेखीत सुरू असलेल्या या केंद्रात बरे झालेल्या एका रुग्णास शुक्रवारी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २१ रुग्णांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. तालुक्यात एकूण ४०३१ व्यक्ती क्वारंटाइन असून, त्यापैकी संस्थात्मक १०९, तर होम क्वारंटाइन झालेले ३९२२ नागरिक आहेत.

जु्न्नर तालुक्यातील गावनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे : डिंगोरे- १ (बरा), सावरगाव- ५ (बरे), मांजरवाडी-  २ (बरे), पारुंडे- ३ (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे ), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी-वडज - १ (बरा), शिरोलीतर्फे आळे- २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा),  औंरगपूर- १ मृत्यू. एक्टिव्ह : कुरण- १, विठ्ठलवाडी- १, ओतूर- २, चिंचोली- ३, धामणखेल- १, कुसुर- १, जुन्नर- १. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT