Poultry 
पुणे

कोरोनाने मारले अन्‌ कोरोनानेच तारले

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - कोरोनामुळे सात-आठ महिन्यांपूर्वी कोलमडून गेलेल्या मावळ तालुक्‍यातील पोल्ट्री व्यवसायाने सध्या बाजारात अंडी व चिकनला प्रचंड मागणी वाढल्याने पुन्हा उभारी धरली आहे. तालुक्‍यातील पाचशेहून अधिक जणांनी हा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू केला आहे. सुरुवातीला कोरोनाने मारले व आता कोरोनानेच तारले, अशी काहीशी अवस्था या व्यवसायाची झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात कोरोना विषाणूचे संकट सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर चिकनबाबत अफवा पसरली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. चिकनचे दर कोसळून मागणीतही मोठी घट झाली होती. ३५ ते ३६ रुपयांना कोंबडीचे पिल्लू घेऊन व ४० ते ४५ दिवस त्यांचा सांभाळ करून १५ ते २० रुपयांना विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. एरवी सर्व जबाबदारी घेणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात शेतकऱ्यांकडून उचललेल्या लॉटचे पेमेंटही कंपन्यांनी अडकून ठेवले होते. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले होते. 

मागणी वाढली तरी पेच कायम
चिकनबाबत पसरलेल्या अफवांबाबत सरकारने जनजागृतीची मोहीम हाती घेतली. चिकनने कोरोना होत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे गैरसमज दूर झाले व मेपासून चिकनला मागणी वाढू लागली. मागणी वाढली तरी कोरोनाचे व त्या अनुषंगाने लॉकडाउनचे संकट कायम राहिल्याने कंपन्या व पोल्ट्री व्यावसायिक रिस्क घेऊन लागली व्यवसाय सुरू करण्यास धजावल्या नाहीत. काही कंपन्या व शेतकऱ्यांनीच रिस्क घेऊन हा व्यवसाय पुन्हा सुरू केला.

पुणेकरांनो, हॉटेलात जेवायला जाताय? मग 'अशा' प्रकारची काळजी घ्या!
 
कोरोनामुळेच मिळाली उभारी
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रोग प्रतिकारशक्ती व शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी अंडी व चिकन खाण्याचा सल्ला दिला गेला. उपचार केंद्रातही कोरोना रुग्णांना दररोज आहारात उकडलेली अंडी दिली जाऊ लागली. परिणामी बाजारात या दोन्हींना मागणी वाढली आहे. बाजारभावही चांगला मिळत आहे. बाजारात मागणी वाढल्याने तालुक्‍यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी पुन्हा जोमाने या व्यवसायाला सुरवात केली आहे.

चार-पाच महिने व्यवसाय बंद राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक हातघाईला आले होते. आता चिकनला मागणी वाढल्याने व्यवसायाला पुन्हा बरकत आली आहे. लॉकडाउनच्या काळातील नुकसान काही प्रमाणात भरून निघत आहे.
- उत्तम शिंदे, पोल्ट्री व्यावसायिक, इंगळूण

आगामी काळात मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून तालुक्‍यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार असून, एकमेकांना सहकार्याचा हातही दिला जाणार आहे. 
- सोनबा गोपाळे, संघटक, मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटना

६ ते ७ (नग) अंडी 
१६० ते १७० रु.  चिकन   

मावळातील स्थिती

  • मावळात छोटे-मोठे बाराशे पोल्ट्रीफार्म
  • किमान तीन हजार ते कमाल ५० हजारांपर्यंत पक्ष्यांची संख्या
  • कोंबडीची पिल्ले, खाद्य, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या पंचवीस ते तीस कंपन्या 
  • प्रिमियम, कुकूचिकू, सिद्धिविनायक, वेंकीज, किरण, भैरवनाथ आदी कंपन्यांचा समावेश
  • शेतकरी कुटुंबाबरोबरच मजूर, ट्रान्स्पोर्ट, चिकन विक्रेते आदी दोन हजार जणांना रोजगार.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT