coronavirus lockdown online opd information marathi 
पुणे

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या घ्या डॉक्टरांचा सल्ला; ऑनलाईन ओपीडी सुरू

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात "कोरोना' वगळता इतर आजार किंवा व्याधी असलेल्या रुग्णांना डॉक्ट रांना कसे भेटायचे, असा प्रश्न  असतो. तसेच, निदान न झालेला कोरोनाबाधीत व्यक्तीमुळे डॉक्टअरांना विलगीकरणात जावे लागते. या सर्व परिस्थितीचा सांगोपांग विचार करून पुण्यातील युवकांनी ऑनलाइन बाह्यरूग्णविभागासाठी "कॉपीऊस' हे संकेतस्थळ विकसित केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोपिऊस हेअल्थकेयर' कंपनीचे मुख्य अधिकारी अश्विन गुपचूप, आश्विन दात्ये आदींनी ही संकल्पना विकसित केली आहे. दात्ये म्हणाले, 'प्रचलित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डॉक्टार आणि रुग्ण यांच्या मदतीला येऊ शकेल अशी संकल्पना विकसित करायचे ठरवले. यामध्ये घरबसल्या डॉक्ट्रांना व्हिडीओद्वारे रुग्णाला तपासता येईल. यामुळे रुग्णाचा आणि डॉक्टारांचा प्रत्यक्ष संपर्क टाळला जाईल.' मोफत असलेल्या या सुविधेसाठी https://opd.copious.care हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशी वापराल ही प्रणाली 

  • डॉक्टरांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी 
  • रुग्णाने संकेतस्थळावर किंवा तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करावी 
  • रेसेपशनिस्ट रुग्णाला एक "लिंक' मोबाईल एसएमएस मार्फत पाठवतील 
  • रुग्ण आणि डॉक्टार व्हिडिओ मीटिंगच्या माध्यमातून समोरासमोर व्याधी बाबत चर्चा करतील 
  • रुग्णाच्या परिस्थिती नुसार औषधाचे प्रेस्क्रिपशन लिंकच्या माध्यमातून पीडिएफमध्ये मिळेल 
  • ज्यानुसार रुग्ण जवळच्या औषधाच्या दुकानातून खरेदी करू शकतील 

प्रणालीचे फायदे 

  • निदान न झालेल्या कोरोनाग्रस्तापासून डॉक्टनरांचा बचाव होईल 
  • घरबसल्या निदान होईल 
  • सोशल डिस्टंसींगचे पालन होत संसर्गाला आळा बसेल 
  • डॉक्टडरांसह रुग्णाचा वेळ आणि श्रम दोनही वाचेल
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हजवळ भरधाव BMW चा अपघात; तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT