coronavirus maharashtra lockdown agent based model harvard university research 
पुणे

मोठा दिलासा : महाराष्ट्रात लॉकडाऊन नव्हे, एजंट बेस्ड मॉडेलचा पर्याय

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : देशतील लॉकडाउन संदर्भात रविवारी (ता. 3) निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग बघता अजूनही लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांची आवश्यीकता आहे. परंतु, राज्याची सामाजिक आणि आर्थिक परस्थिती बघता लॉकडाउनमध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. याचाच विचार करत अमेरिकेतील हार्वड विद्यापीठ आणि एमआयटीच्या संशोधकांनी लॉकडाउनसाठी एक पर्यायी सुवर्णमध्य शोधला आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

राज्यामध्ये सलग लॉकडाउन न करता, दर दुसऱ्या आठवड्याने लॉकडाउनचा प्रयोग करावा, असा निष्कर्ष यात मांडण्यात आला आहे. यामुळे निदान एक आठवडा आवश्यक कामांसाठी नागरिकांसह प्रशासनाला हालचाल करता येईल. लॉकडाउन नसलेल्या कालावधीत नागरिकांनी शारीरिक अंतराचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. अशा स्थितीतही नियंत्रित पद्धतीने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल, अशी माहिती हार्वड मधील संशोधक आदित्य माटे यांनी दिली. संशोधनामध्ये प्रा.एम.मुजुमदार, प्रा.मिलिंद तांबे आदींचा सहभाग आहे.

मुजुमदार म्हणाले, ‘पुढील काही दिवसांसाठी योग्य पॉलिसी निवडणे केंद्र आणि राज्यासाठीही मोठे आव्हान असणार आहे. सामाजिक आणि आर्थिक गोष्टींवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा विचार आमच्यासंशोधनात करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय, राहण्याची पद्धत, ठिकाण आदी माहितीच्या आधारे हे सिम्युलेशन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती कोरोनाचा प्रसार करतो असे गृहीत धरून एजंट बेस्ड मॉडेलचा आधार घेण्यात आला आहे.’ महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांसाठी संशोधकांनी हे मॉडेल विकसित केले आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

संशोधनाची पार्श्वयभूमी

  • 24 मार्च पासून लॉकडाउन असूनही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे
  • आर्थिक आणि सामाजिक पैलूंचा विचार करता 3 मे नंतर सलग लॉकडाउन शक्य नाही
  • कोरोना बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी आणि बाधितांची संख्या यांच्या विश्लेआषण आवश्यक
  • औषध येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य पद्धतीची आवश्यकता 

असे झाले संशोधन

  • पहिल्या तीन आठवड्यातील लॉकडाउनमधील कोरोना प्रसाराची आकडेवारीचे संकलन
  • बाधितांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, राहण्याची पद्धत, पर्यावरणीय घटक यांचे विश्लेषण करण्यात आले
  • उपलब्ध माहितीचे एजंट बेस्ड एसईआयआर मॉडेलच्या आधारे संगणकीय सिम्युलेशन करण्यात आले
  • सलग आणि दर दुसऱ्या दिवसाला लॉकडाउनची या दोन पर्यायांची चाचपणी करण्यात आली
  • 7 जूनपर्यंत होणाऱ्या परिणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला
  • संशोधनाचे निष्कर्ष
  • दर दुसऱ्या आठवड्याला लॉकडाउन पाळल्यास बाधितांची संख्या नियंत्रित पद्धतीने वाढेललॉकडाउन नसताना शारीरिक अंतर (सोशल डिस्टंसींग) आणि इतर नियमांचे काटेकोर पालन आवश्ययक
  • हे केवळ संगणकाच्या आधारे केलेल हे संख्याशास्त्रीय विश्लेनषण आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पद्धतीचे फायदे

  • प्रशासनाला आणि नागरिकांना आवश्यहक कामांसाठी मोकळीक मिळेल
  • औद्योगिक आणि व्यावसायिक कामांचे चक्र सुरू होईल
  • दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हालचाली करणे शक्य होईल
  • कृषी, लघू आणि मध्यम उद्योगांना आवश्यहक उपाययोजना करता येतील
  • पावसाळ्याच्या दृष्टीने आवश्यआक कृषी, उद्योग आणि प्रशासकीय कामांना वेग मिळेल 

सलग सहा आठवड्यांच्या लॉकडाउनमूळे कोरोनाचा प्रसार नियंत्रित पद्धतीने होत आहे. असे असतानाही राज्यात बाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. राज्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता दीर्घकालीन लॉकडाउनसाठी पर्यायी उपाययोजना आपल्याला अभ्यासाव्या लागतील. 
- प्रा. मिलिंद तांबे, संगणकशास्त्र विभाग, हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking: किडनी विक्री प्रकरणातील एजंट ‘डॉ. कृष्णा’ निघाला इंजिनिअर, सोलापुरात केली अटक; बनावट नावाने पीडित शोधायचा

High BP and Pregnancy: उच्च रक्तदाब असल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती; कामा रुग्णालयातील डॉक्टरांचा अभ्यास

Jalna Crime: कारमधील मृत्यूचा उलगडा; पंचवीस लाखांची सुपारी देऊन खून, जालन्यातील प्रकरण, दोन संशयितांना पोलिस कोठडी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ई-पीक पाहणी न झालेल्यांसाठी आता ऑफलाइन नोंद; नेमकं काय करावे लागणार?

Radio Ceylon: रसिकांना रिजवणाऱ्या ‘रेडिओ सिलोन’नेची शताब्दी; भारतासह जगभरात लोकप्रिय, ‘बिनाका गीतमाला’सह गाजले अनेक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT