coronavirus maharashtra lock down red orange green zone facilities 
पुणे

जाणून घ्या महाराष्ट्रात कुठं? काय सुरू राहणार?; मुंबई, पुणेकरांना थोडा फार दिलासा!

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : वाढलेल्या लॉकडाउनमधून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुधारित आदेश रविवारी प्रसिद्द केला. दारूची दुकाने, कुरिअर सेवा, ओपीडी आता महापालिका क्षेत्रातही अतिसंक्रमनशील भाग सोडून सुरू होणार आहेत. पुण्यात शासकीय कार्यालये 5 टक्के उपस्थित सुरू होतील.

पुणे शहराचा समावेश रेड झोनमध्ये असला तरी, राज्य सरकारच्या निर्णयामुळे मुंबई आणि पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. तर, अन्य जिल्ह्यांत बऱयापैकी शिथिलता मिळाली आहे. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्याच्या झोननुसार सुविधा सुरू राहणार आहेत. 

कंटेनन्मेंट झोनमध्ये बंदीच
केंद्र सरकारने लॉक डाउन 17 मेपर्यंत वाढविला आहे. तसेच राज्य सरकारनेही पुण्याचा समावेश रेड झोनमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार राज्य सरकारने रविवारी दुपारी सुधारित आदेश काढला. त्यात मद्यविक्रीची दुकाने, कुरिअर आणि रुग्णालयांच्या ओपीडी महापालिका क्षेत्रात सुरू राहतील. मात्र, अतिसंक्रमणशील भागात (कंटेनन्मेंट झोन) त्यांच्यावरील बंदी कायम असेल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. दारू विक्रीतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे ती दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्येच कंटेनन्मेंट झोन मोठ्या प्रमाणावर आहेत. या झोनमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात आलेली नाही. 

पुण्यातल्या पेठांमध्ये ओपीडी सुरू होणार
पुण्यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील, येरवडा, घोले रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील भाग अतिसंक्रमणशील भागात येतो. हा परिसर सोडून शहरात अन्यत्र आता मद्यविक्री, कुरिअर आणि ओपीडी सेवा सुरू होऊ शकते. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारचा आदेश थोड्याच वेळापूर्वी आला आहे. त्याचा अभ्यास करून त्यानुसार शहरासाठी निर्णय होईल आणि त्याच्या अंमलबजावणीला उद्यापासून (4 मे) प्रारंभ होईल. राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोन असलेल्या जिल्ह्यांत टॅक्सी, कॅब, सलून, खासगी व शासकीय कार्यालये आदींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शाळा, हॉटेल्स, मॉल, शैक्षणिक संस्था आदींवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. उद्योगांनाही रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. बांधकांनाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. अतिसंक्रमणशील भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा, विक्रीला तसेच वैद्यकीय सेवेसाठी दिलेली परवानगी कायम ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT