plasma-therapy
plasma-therapy 
पुणे

तुम्हाला माहिती आहे का? प्लाझ्मा थेरपी, हा प्रयोग; उपचार नव्हे!

सकाळवृत्तसेवा

पुणे : जगभरात कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असताना सध्या भारतात या साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. तर केंद्र सरकारतर्फे नुकतेच प्लाझ्मा थेरपीचा केवळ प्रयोग म्हणून वापर करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. ही उपचारपद्धत प्रभावी ठरत असल्याचे लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजच्या वतीने सांगण्यात आले आहे. परंतु, केंद्र प्रशासनाच्या निर्देशानुसार सध्या ही उपचाराची पद्धत खरच प्रभावशाली आहे की नाही असा प्रश्न सर्वांमध्ये निर्माण होत आहे.

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरपी संदर्भातील सद्यस्थिती आणि माहिती जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सकाळला दिली.

कोविड 19 साठी प्लाझ्मा थेरपी 
कोरोना या साथीचा रोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात या विषाणूच्या विरोधात 'अॅन्टीबॉडीझ' तयार होतात. अॅन्टीबॉडीझ माणसाच्या प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर रंगचा द्रव) तयार होत असतात. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा कोरोना बाधित रुग्णाला बरं करण्यासाठी वापरला जातो. आजारी व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. याकरिता कोरोनाबाधित रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे 'पॅसिव्ह इम्युनिटी' (दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या विषाणू विरोधक ऍन्टीबॉडीझ) मिळते. त्यामुळे कोरोनाबधित रुग्ण हा कमीकालावधीत बरा होतो.

सध्या कोविड-19 च्या रुग्णांच्या उपचारासाठी या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यासाठी काही ठराविक संस्थानाचा मान्यता देण्यात आली आहे. तरी सुद्धा देशातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी याचा वापर केला जात आहे. 

कधी आणि का करावी प्लाझ्मा थेरपी
प्लाझ्मा थेरपी पूर्वी सुद्धा कित्येक आजारांच्या उपचारासाठी वापरण्यात आली आहे. कोविड 19 च्या उपचारासाठी कोणत्याही प्रकारची लस व औषधे नसल्याने प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. भारतात आयसीएमआर च्या मार्गदर्शनाखाली या थेरपीचा अभ्यास (संशोधनात्मक अभ्यास) सुरू आहे. सध्या या रोगावर कोणत्याही प्रकारची लस नसल्याने तसेच यावर कोणते औषध कारगर आहे याची माहिती नसल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोविड 19 या विषाणूचा अभ्यास जगभरात सुरू आहे. या संबंधित संपूर्ण माहिती अद्याप नसल्याने अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या थेरपीचा वापर करायला पाहिजे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

डॉ. कुलकर्णी म्हणाले, 'सध्या प्लाझ्मा थेरपी संशोधनाच्या स्थितीमध्ये असून नेमका हा उपचारासाठीची योग्य उपाय आहे असे म्हणणे अवघड आहे. कोविड 19 च्या रुग्णांच्या उपचार प्रणालीवर सातत्याने अभ्यास चालू आहे. त्यामध्ये औषधांबरोबर प्लाझ्मा थेरपीचा पण समावेश आहे.' सध्या आयसीएमआर तर्फे देशातील 25 संस्थांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा क्लिनिकल ट्रायलची सुरुवात केली आहे. यामध्ये सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे 450 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचे ट्रायल व त्या आधारावर संशोधनात्मक अभ्यास केला जाणार आहे. तसेच प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी कारगर व सुरक्षित आहे की नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

अशी करतात प्लाझ्मा थेरपी!
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये विषाणूंच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या अँटीबॉडीज असतात. त्याचा वापर अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांवर या माध्ममातून करता येणार आहे. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे दोनशे मिली रक्त घेतले जाते. त्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो. तो प्लाझ्मा कोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब, असे विकार असणाऱ्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT