Pune
Pune 
पुणे

पुणेकरांनो ऐकलं का? जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर दुकाने खुली; कंटेन्मेंट झोनमध्ये बंदी

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील 97 टक्के भागातील जीवनाश्‍यक वस्तूंसह अन्य दुकाने सुरू करता येणार आहे. याबाबतचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. मात्र, शहराचा 3 टक्के भाग "कंटेन्मेंट झोन' असून, तेथील दुकाने बंदच राहणार आहेत, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्पष्ट केले.

याला असेल परवानगी

  • प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूची मिळून दहा दुकाने खुली 
  • पेट्रोलपंपांवर सामान्य नागरिकांनाही पेट्रोल 
  • प्रमुख रस्ते-चौकांतून ये-जा करता येणार 
  • चारचाकी, दुचाकी वाहनांचा वापर करता येणार 
  • मोलकरणींना घरकाम करता येणार 
  • मद्याची दुकाने सुरू राहणार 
  • बांधकामे सुरू करता येणार 
  • ई-कॉमर्स अंतर्गत येणाऱ्या आस्थापना सुरू 
  • सलग दुकाने असलेल्या रस्त्यांवर दिवसाआड व्यवहार 

बांधकामांना काही अटींवर परवानगी 
शहरातील बांधकामे सुरू करण्यास महापालिकेने काही अटींवर परवानगी दिली आहे. सध्या बांधकामे सुरू आहेत आणि कामगारांच्या राहण्याची तिथेच व्यवस्था आहे, अशी ठिकाणी बांधकामास परवानगी आहे, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रस्त्यांवरील बॅरिकेड काढणार 
शहर सील केल्यानंतर आणि संचारबंदी लागू होताच प्रमुख रस्ते आणि जोडरस्त्यावर उभारलेले बॅरिकेड आता काढण्यात येणार आहेत. यामुळे लोकांना ये-जा करणे सोईचे होईल आणि वाहतूक जलद गतीने होईल. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

आयटी कंपन्यांसाठी "वर्क फ्रॉम होम' 
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्या तूर्त सुरू करता येणार नाहीत. या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवस घरातून काम (वर्क फॉर्म होम) करावे लागणार आहे. धार्मिक स्थळे सुरू करता येतील परंतु, त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल, असे गायकवाड यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

Ruben Trumpelmann : बुमराह-शमीला जे जमले नाही ते नामिबियाच्या पठ्ठ्याने केलं! टी-20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढले देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

SCROLL FOR NEXT