coronavirus schools pune no decision yet says collector 
पुणे

पुण्यात कोरोनामुळं पालकांना धास्ती; शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोनाच्या धास्तीने पालकांची चिंता वाढविली असून, कात्रजमधील एका खासगी व्यवस्थापनाच्या  संस्थेने उद्यापासून त्यांच्या शाळेला सुट्टी दिली आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी देण्याचा कोणताही आदेश दिला नसून केवळ खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. 

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने शाळांना सुट्टी आहे, अशी विचारणा केली जात आहे. त्या पार्शवभूमीवर कात्रज भागातील सीबीएसईशी संलग्न असलेल्या सरहद शाळेने उद्यापासून सुट्टी जाहीर केली आहे. शाळा सुरू करण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. आणखी दोन शाळांनी सुट्टी जाहीर केली असून, त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले, "शाळेला सुट्टी देण्याचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. तरीही राज्य बोर्डाच्या शाळांबाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही शाळा बंदबाबत आदेश आलेला नाही. या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शाळांना खबरदारी घेण्याच़्ा सूचना दिल्या आहेत. सरहदचे अध्यक्ष संजय नहार म्हणाले, " पुण्यात रुग्ण आढळल्याने पालकांमध्ये धास्ती आहे. शाळा बंद ठेवणार का, अशी काळजीने विचारणा केली जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून उद्यापासून रविवारपर्यंत शाळा बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT