coronavirus spreading outside containment zone collector naval kishore ram 
पुणे

पुण्यात परिस्थिती चिंताजनकच : आता कंटेन्मेंट झोनबाहेरही कोरोना पसरतोय!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : जिल्ह्यात 31 मे नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. परंतु, कोरोनाबाबत सद्यस्थितीचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राज्य सरकार पूर्णपणे अवगत असून, लॉकडाऊनबाबत राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कंटेन्मेट झोनबाहेरही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी राम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर रुग्ण आढळून येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी कंटेनमेंट झोनच्या बाहेर रुग्णांचे प्रमाण 25 टक्के होते. ते आता 35 टक्के झाले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने रिस्पॉन्स मेकॅनिझम तयार केले आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण हे कमी झाले आहे. हे प्रमाण 4.4 टक्के झाले आहे. मृत्यू कोणत्या कारणांमुळे होत आहेत, याची माहिती संकलित करून विश्लेषण करण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून न घेण्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील रुग्णांच्या उपचाराबाबत आढावा घेण्यात येत आहे, असे राम यांनी सांगितले.  ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये व्हिडिओद्वारे संवाद
कोरोना बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मानसिक ताण येतो. त्यामुळे ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या समुपदेशनाचे काम सुरू केले आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात व्हिडिओद्वारे संवाद साधण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT