flight 
पुणे

Coronavirus : महिनाभरात परदेशात कोण, कोठे गेले?

सकाळवृत्तसेवा

पुणे : गेल्या महिनाभरात परदेशांमध्ये प्रवास करणाऱ्या येथील हॉटेलमध्ये मुक्‍कामी असलेल्या परदेशी नागरिकांबाबत पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. या वेळी डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांशी गुरुवारी संवाद साधला. 

हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतल्यास कोरोना प्रतिबंधाबाबत मदत होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे. सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी. त्यापैकी एखाद्या प्रवाशाला ताप, खोकला असल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांना दिल्या. पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम, महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड, श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख आणि प्रशासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

‘घाबरू नका, सावध राहा’ 
शहरात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्‍यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे. घाबरू नका, सावध राहा आणि लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT