covid19 Sakal Media
पुणे

आंबेगाव : तपासणी न करताच कोरोनो रिपोर्ट

आंबेगाव तालुक्यातील काही जणांना मिळाले कोरोनो तपासणीचे प्रमाणपत्र

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : आंबेगाव तालुक्यात काही जणांना कोरोनो तपासणी न करताही शासनाकडुन तुमची अॅटीजन कोरोनो चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने पाठवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दोन आठवड्यापासुन अॅटीजन तपासणी कीट उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोविडची लक्षणे असलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोनो तपासणी केली जात आहे. शुक्रवार (ता. 21) रोजी आंबेगाव तालुक्यातील काही जणांना कोणतीही कोरोनो तपासणी न करता महाराष्ट्र शासनाच्या वतीने डीर्पाटमेंट ऑफ डीझास्टर मॅनेजमेंट ,रेलिफ अॅण्ड रिहाबीलेशन विभागाकडुन ऑनलाईन पध्दतीने तुमची 11 मे 2021 रोजी केलेली अॅटीजन कोरोनो चाचणी निगेटीव्ह आल्याचे प्रमाणपत्र पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे शासनाकडे दोन आठवड्यापासून अॅटीजन तपासणी कीट उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरटीपीसीआर पध्दतीने कोरोनाच्या तपासण्या करत आहे. दुसरीकडे मात्र काही खासगी पॅथालॉजी लॅबमध्ये परवानगी नसतानाही अॅटीजन कोरोनो चाचणी केली जाते मग त्यांच्याकडे अॅटीजन तपासणी कीट कोठून उपलब्ध होतात हा सवाल उपस्थित होत आहे.

शासन मात्र कोणत्याही प्रकारची कोरोनो तपासणी न करता काहींना तुमची अॅटीजन कोरोनो चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने पाठवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासन कोणतीही कोरोनो तपासणी न करता चुकीच्या पध्दतीने चुकीच्या नावांच्या नोंदी करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी चुकीच्या प्रमाणपत्र आलेल्या नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT