pune municipal corporation
pune municipal corporation Sakal
पुणे

पुणे : काँग्रेसने मागवली महापालिकेसाठी इच्छुकांची नावे

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी (Pune Corporation Election) काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला असताना आता महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी प्रदेश काँग्रेसला (Congress) पाठविण्याचे आदेश शहराध्यक्षांना दिले आहेत. ही नावे पाठविण्यापूर्वी पुण्यामध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकार, नगरसेवक, माजी आमदार यांची बैठक होणार आहे. (Pune Corporation Political News)

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार असले तरी महापालिका निवडणूकीसाठी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार सांगितले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेऊ असे सांगत असले तरी, काँग्रेसने अद्याप त्यांची स्वबळाची भाषा बदललेली नाही.

तर, महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तसेच विद्यमान नगरसेवक खासगीमध्ये निवडणुकीमध्ये आघाडी झाली पाहिजे असे सांगत असल्याने काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह समोर आले आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेसचे १० नगरसेवक असले तरी त्यासही गटबाजीने ग्रासलेले आहे. अशा स्थितीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.

पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग होणार आहे. महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये २४ बदल सुचविण्यात आल्याने महापालिकेने तयार केलेला आराखड्यात मोठ्याप्रमाणात बदल होणार असल्याने आहेत.

एकीकडे प्रभाग रचना सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे पत्र शहराध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे इच्छुकांनी देखील त्यांचे वजन प्रदेश कार्यकारिणीत पडावे यासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार, ज्येष्ठ नगरसेवकांकडे फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी पाठविण्यासाठी प्रदेश कार्यालयाचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार पक्षाचे नगरसेवक, माजी आमदार, प्रमुख पदाधिकार, ब्लॉक अध्यक्ष यांची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी ही यादी पाठवावी लागणार आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले असल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू आहे, हायकमांडकडून अंतिम आदेश जसा येईल, तशी निवडणूक लढवली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT