kothrud12.jpg
kothrud12.jpg 
पुणे

लाॅकडाउनमुळे कोथरूडमध्ये `ते` दोघे झाले असे विवाहबध्द

सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) :  कोरोनामुळे अनेक प्रथा परंपरा मागे पडून नवीन रिवाज रुजत आहेत. कोथरूडच्या केळेवाडी भागात राहणा-या अमृता आणि गोसावी वस्ती मधील रोहित यांचा विवाह थाटाटात व्हावा अशी खूप इच्छा त्यांच्यापेक्षा नातेवाईकांना होती. परंतु, कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी अशी चर्चा सुरू झाली. 
मिलिंद संघाचे कार्यकर्ते, वधू वर आणि कुटूंबीय या सर्वांनी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. 

या लग्नसोहळ्यातील वर रोहित सदाशिवे हे 'कुटुंब फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर वधू अमृता शेजवळ ही 'मिलिंद संघ' या सामाजिक संघटनेची सक्रिय कार्यकर्ती आहे. मिलिंद संघाचे सदस्य निखिल शेजवळ म्हणाले की,  इतर वेळी आम्ही जेव्हा साधेपणाचा आग्रह धरला तेव्हा तो डावलण्यात आला. पण कोरोनाने आम्हाला जे चांगले धडे शिकवले. त्यापैकी हा एक म्हणावा लागेल. लग्नसराई म्हंटल की.., प्रशस्त हॉल, वाजंत्री, डीजे, साऊंड, डेकोरेशन, व्हिडीओ शूटिंग, हुंडा देणे, हजारो लोकांसाठी भोजन असा भरमसाठ खर्चाचा डोंगर नवरीमुलीच्या कुटुंबावर येत असतो. लाॅकडाउन काळात अशा खर्चाला फाटा देत अनेक विवाह सोहळे संपन्न होत आहेत. आम्ही सर्वांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

नवरी मुलीच्या घराशेजारील बुद्ध विहारात हा सोहळा आनंदात संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने वर-वधू सहित आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळींनी मास्क घालून उपस्थिती लावली, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हातावर-अंगावर सॅनिटाईर फवारणी करून लग्न सोहळ्यात प्रवेश दिला जात होता. आपापसात योग्य अंतर ठेवून घरातील दोन्ही कुटुंबातील मोजकेच मंडळी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT