पुणे

जोडप्याने मास्क लावून केलं लग्न अन्...

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात वृत्तपत्र, सोशल मीडिया, व्हॉट्सऍप व फेसबुकसारख्या अनेक माध्यमांद्वारे नागरिकांना अलर्ट राहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रचार केला जातोय. याचबरोबर नागरिकांकडून जनजागृती केली जातेय. असाच एक क्षण एका विवाह सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाला.

भवानी पेठ हरकानगर परिसरात समाजभूषण पुरस्कर्ते शशिकांत म्हेत्रे यांची कन्या दीपमाला हीचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी वधू व वराने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःहून नातेवाईक व पाहुण्यांना मास्क वाटून प्रत्येकाला घालण्याची विनंती केली. त्यामुळे आगळा-वेगळा सोहळा पाहायला मिळाला. 

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. ते म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घाबरून जाण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. खोकताना व शिंकताना सतत रुमालाचा वापर केला पाहिजे व साबण, हॅन्ड वॉश व सॅनिटायझरद्वारे आपले हात स्वच्छ केले पाहिजे.

तसेच दर दहा ते पंधरा मिनिटांनी अनेकजण सॅनिटायझरचा वापर करत असल्याने त्याचा दुष्परिणामही हातावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणं हे महत्त्वाचे असल्याने गर्दी टाळा, असे आवाहनही कांबळे यांनी केले.

यावेळी राज्यमंत्री मुकेश सारवान, आमदार सुनील कांबळे, नगरसेविका मनीषा लडकत, माजी नगरसेवक संदीप लडकत, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, शैलेश म्हेत्रे, मोनीश म्हेत्रे  आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT