पुणे

कर्जबाजारी झाल्यानेच दांपत्याची आत्महत्या?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी- काळेवाडी येथून बेपत्ता झालेल्या दांपत्याने कोल्हापूर येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, एका व्हॉटसॲप ग्रुपवर आलेल्या माहितीवरून ही घटना उघडकीस आली. कालेकर यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

हर्षदा अविनाश कालेकर (वय ३९), अविनाश मारुती कालेकर (वय ४३, दोघेही रा. तापकीरनगर, काळेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. कालेकर कुटुंब मूळचे घोटावडे येथील असून, काही वर्षांपूर्वी ते काळेवाडी येथे राहायला आले. त्यांना भावेश (वय ११) व भक्ती (वय १३) ही मुले असून, भावेश कोल्हापूर येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत आहे. तर भक्ती काळेवाडीतील एका शाळेत शिकायला आहे. त्यांचा नऱ्हे येथील दत्तवाडी येथे चिक्की बनविण्याचा कारखाना आहे. शनिवारी (ता. १२) दोघे नेहमीप्रमाणे कारखान्यात जातो, असे सांगून गेले. मात्र, ते कारखान्यात पोचलेच नाही. कारखान्यात माल देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी तेथील कामगाराने त्यांना फोन केला असता तो बंद लागत होता. त्यामुळे कामगाराने घरी फोन केला. त्या वेळी ते दोघे पोचले नसल्याचे समोर आले. त्यानंतर अविनाश यांच्या भावाने सर्वत्र शोध घेतला. मात्र, कुठेही त्यांचा शोध न लागल्याने वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. शनिवारी (ता. १२) सायंकाळी त्यांच्या भावाच्या व्हॉटसॲपवर अविनाश यांचा मेसेज आला व त्यानंतर मोबाईल बंद झाला. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते साताऱ्यातील वाई येथे दाखविले. अविनाश यांचे नातेवाईक त्यांचा शोधण्यासाठी वाईला गेले. मात्र, कुठेही शोध लागला नाही. 

रविवारी (ता. १३) कोल्हापूर येथे रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती कोल्हापूर येथील एका रेल्वे पोलिसाने व्हॉटसॲप ग्रुपवर टाकली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, काळेवाडी येथून बेपत्ता झालेल्या कालेकर दांपत्याचे वर्णन आणि व्हॉटसॲपवर ग्रुपवरील मृत व्यक्तींचे वर्णन एकच असल्याने मृतांची ओळख पटली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक कोल्हापूरला रवाना झाले. शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. सोमवारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मावळात सर्वांकडून खर्च सादर
वडगाव मावळ : मावळ मतदारसंघात आतापर्यंत सर्व सातही उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील नियमितपणे सादर केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारांना अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन होणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. मावळमधील सर्व उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्चाचा तपशील सादर केला आहे. निवडणूक आयोगाने नेमलेले मुख्य खर्च निरीक्षक रोहित मेहरा यांनी शुक्रवारी (ता. ११) भेट देऊन उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT