dsk-k.jpg
dsk-k.jpg 
पुणे

तब्बल अडीच वर्षानंतर डीएसके येणार तुरुंगाबाहेर, कारण घ्या जाणून

सकाळवृत्तसेवा

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसाय दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि कुटुंबियांना मुलीच्या तेराव्यास जाण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षानंतर डीएसके काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी याबाबत आदेश दिले. 

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांचा काही दिवसांपूर्वी आजारपणाने मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या अंत्यविधीला हजर राहता न आल्याने तेराव्यास जाण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज डीएसके, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी केला होता. तो मान्य करत न्यायालयाने 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तेराव्याच्या कार्यक्रमात काही तास हजर होण्यास तिघांनाही परवानगी दिली आहे.

कारागृहातून बाहेर पडल्यापासून पुन्हा कारागृहात येईपर्यंत पोलिसांचे पथक त्यांच्या बरोबर असणार आहे. तसेच त्यांनी कोरोना विषयक सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे निर्देश न्यायालयाने आदेशात दिले आहे. डीएसके यांच्यावर दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अश्विनी देशपांडे देखील आरोपी होत्या. परवानगी मिळण्याबाबत डीएसके यांनी ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. 

या गुन्ह्यात डीएसके व कुटुंबियांसह आणखी काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी या प्रकरणात जामीन मिळाला आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT