पुणे

पुण्यात आज चार केंद्रांवर देणार कोव्हॅक्सिन लस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारकडून शहराला शुक्रवारी नव्याने कोविशिल्ड लसींचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण शनिवारी बंद राहणार आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांना मात्र पहिला डोस दिला जाणार आहे. तो ही सहा ऐवजी चार केंद्रांवर मिळणार आहे. या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी पुणे महापालिका हद्दीत लसीकरणाचे ८० टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले असून, ठरवलेल्या १९ हजार ४०० लसीकरणाऐवजी १५ हजार ५८६ जणांनाच लस देण्यात आली. महापालिकेकडून काही लसीकरण केंद्रांना शनिवारी, तर काही केंद्रांना रविवारी सुटी देण्यात येते.


गेल्या मंगळवारी आणि गुरुवारी राज्य सरकारकडून महापालिकेला लसींचा पुरवठा झाला होता. त्यातून ४५ वयोगटावरील दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी ७ मेपर्यंतचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले होते. दरम्यान, आज शहराला नवीन डोस उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे नोंदणी न झालेले, तसेच नोंदणी झालेल्या ४५ वयोगटावरील कोणत्याही नागरिकांचे उद्या लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे.

ही चार केंद्र सुरू राहणार (१८ ते ४४ वयोगटासाठी )
१) अण्णासाहेब मगर हॉस्पिटल, हडपसर
२)जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
३) मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल, धायरी
४) ससून हॉस्पिटल, स्टेशन रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Mangalwedha News : ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाकडे आहे त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये; माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Mumbai Crime : गर्दीच्या लोकलमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; २१ वर्षीय महिला जाळ्यात, ३.४३ लाखांचे दागिने जप्त

Pune News : विनानिविदा झाडणकामात घुसखोरीचा प्रयत्न; दोन ठेकेदारांना घुसविण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT