covaxin_ ESakal
पुणे

राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात सर्वाधिक कोव्हॅक्सिनचे डोस वाया

राज्यात कोव्हॅक्सिन वाया जाण्याचे प्रमाण 0.79 टक्के इतके आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीच्या (Covishild ) तुलनेत कोव्हॅक्सिन (Covaxin) लसी वाया जाण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लस वाया जाण्याचे प्रमाण 1.76 टक्के आहे तर, कोव्हॅक्सिनचे हेच प्रमाण 3.17 टक्के इतके आहे. दरम्यान, राज्यात कोव्हॅक्सिन लस वाया जाण्याचे प्रमाण 0.79 टक्के इतके नोंदवले गेले आहे. कॉविनच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोविशील्डचे 1.25 कोटी तर, कोव्हॅक्सिनचे 9.84 लाख डोस देण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

कोव्हॅक्सिन लस मिळण्याची मर्यादित ठिकाणे, मर्यादित पुरवठा आणि मर्यादित लाभार्थी यामुळे या लसीला मर्यादित प्रतिसाद मिळत असल्याचे पुणे विभागाचे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) संजय देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले की, राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येदेखील कोव्हॅक्सिन लसींचा अपव्यय अधिक असल्याचे दिसून आले आहे. लस वाया जाण्यामागे काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात निर्माण झालेला सिरिंजचा तुटवडा हेदेखील असू शकते. परंतु, आता याकडे आता लक्ष दिले जात असून लसी वाया जाण्याचे प्रमाण कमी होत आहे.

दरम्यान, कोव्हॅक्सिनसाठी जिल्ह्यातील एकमेव समर्पित असलेल्या औंधमधील जिल्हा रूग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जानेवारीपासून केवळ 145 डोस वाया गेल्याची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात कोव्हॅक्सिन लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते, कारण त्यावेळी ही लस केवळ 20 डोसच्या कुपीमध्ये येत होती. मात्र, आता ही कुपी 20, 10 आणि पाच डोसच्या कुपींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही का? जाणून घ्या नवा नियम

IPL 2026 : शुभमन गिलच्या संघातील स्टार खेळाडूची नको ती कृती, Viral Video ने अनेकांच्या भुवया उंचावल्या... वादाला फुटले तोंड

Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

लक्षणे नाहीत तरीही धोका मोठा! वयाच्या 45 नंतर ‘या’ कॅन्सरची तपासणी का गरजेची?

Latest Marathi News Live Update: अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मी आक्रमक

SCROLL FOR NEXT