quarantine center.jpg 
पुणे

हवेलीतील 'या' भागात होणार कोविड केअर सेंटर

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : हवेली तालुक्यातील पश्‍चिम भागासाठी म्हणजे खडकवासला मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी कोविड केअर सेंटर नऱ्हे येथे सुरू करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी येथील वस्तीगृहाच्या 200 खोल्या ताब्यात घेण्याचे आणि काम तालुका युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देताना हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले की, "हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामी रुग्ण संशयित झाल्यापासून तो रुग्ण दवाखान्यात दाखल होईपर्यंत काही दिवसांचा कालावधी जात आहे. त्याकाळात त्याच्यावर उपचार होण्याची गरज आहे.
गंभीररीत्या आजारी आहेत. कोरोनाची लक्षणे दिसत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणतीही लक्षणे नाहीत परंतु ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, अशा रुग्णांसाठी येथे उपचार केले जाणार आहे. नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे
मुलांच्या वसतिगृहाच्या शंभर खोल्या आणि मुलींच्या वस्तीगृहाच्या शंभर खोल्या अशा 200 खोल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुरुष आणि स्त्री असे दोन्ही मिळून याठिकाणी 368 बेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे. आता यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली जात आहे. जेवण पुरवठादार, हाउस कीपिंग व्यवस्था शोधणे तसेच चार वैद्यकीय अधिकारी चार परिचारिका अशी येथील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे.


याबाबत माहिती देताना हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले की, हवेलीच्या पश्चिम भागात नऱ्हे, कोंढवे-धावडे, खडकवासला, नांदेड, न्यू कोपरे, खानापूर, किरकटवाडी या मोठ्या गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात जागा उपलब्ध होत नाही. परंतु, त्यांना वेळेत उपचार मिळणे अपेक्षित असल्यामुळे ही सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत पवार यांनी हवेली तालुका आरोग्य विभागाची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत या संदर्भाने कोविड केअर सेंटर चालू करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT