bhor 
पुणे

कोरोनाच्या लढाईसाठी भोरमध्ये उभारणार खास हॉस्पिटल

विजय जाधव

भोर (पुणे) : पुण्यातील कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड (जागा) उपलब्ध नसल्यामुळे भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची सोय भोरमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी भोर तालुक्यात कोविड केअर हॉस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे इंन्सीडंट कमांडर तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. 

भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना पुण्यातील नवले हॉस्पिटल व औध येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे. परंतु तेथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या भरपूर असल्यामुळे भोरमधील रुग्णांना पाठविता येत नाही. तेथे जागा रिकामी झाली, तरच भोरमधील नवीन रुग्णांना पाठविण्यात येत आहे. सध्या भोर तालुक्यातील कोरोनाबाधीत १५ रुग्ण हे  भोरमधील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे कोविड उपचार घेत आहेत.  यामध्ये गुरुवारी आणखी ९ जणांची वाढ झाली आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची जास्त लक्षणे दिसत आहेत, ज्या रुग्णांना कोरोनाशिवाय आणखी इतर दुसरे आजार आहेत, अशांना पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. आयटीआयमधील अशा तीन रुग्णांना आज (गुरुवारी) सायंकाळी पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.

पुण्यातील होप फाउंडेशन यांनी भोरमधील कोविड केअर हॉस्पिटलसाठी रुग्णांकरीता खाटा, गादी, बेडशिट व इतर साहित्य पुरविण्यासाठी होकार दर्शविला आहे. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. तालुक्यात कोविड केअर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य केंद्र निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन तालुक्यातील कोरोना रुग्णांवर भोरमध्येच उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT