hos.jpg 
पुणे

अवसरी खुर्द येथे एक हजार बेडचे कोविड सेंटर

सकाळवृत्तसेवा

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून मंचर (ता आंबेगाव) जवळील भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने 150 बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू  करण्याचा तसेच  अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय आज(ता १३)  राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

मंचर (ता आंबेगाव)  येथे वळसे पाटील यांनी वाढते कोरोना संकट व त्यावरील उपाय योजना यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, महसूल विभाग व खासगी डॉक्टर यांचे समवेत आज  येथील शासकीय विश्राम गृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यात 150 बेडचे कोविड उपचार केंद्र व एक हजार बेडचे केविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नंदापूरकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, तहसीलदार रमा जोशी, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उप सभापती संतोष भोर, नंदकुमार सोनावले, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. चांदरणी पाटील, डॉ.सचिन गाडे, डॉ.नरेंद्र लोहकरे, डॉ.सुनील खिवंसरा, डॉ.खेडकर, डॉ.गुजराथी, डॉ.फडतरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT