The creation of masks through the efforts of young doctors.jpg 
पुणे

Corona Virus : डॉक्टरांच्या प्रयत्नातून थ्रीडी प्रिंटेड एन 95 मास्कची निर्मिती; निर्जंतुकीकरण करुन होतोय पुर्नवापर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नायडू रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची स्वेच्छेने विनामूल्य सेवा करणाऱ्या दोन तरुण डॉक्टरांनी स्थानिक अभियंत्यांच्या मदतीने थ्रीडी प्रिंटेड एन 95 मास्कची निर्मिती केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हे मास्क उपयोगी ठरतील, असा विश्वास या डॉक्टरांनी व्यक्त केला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साथ नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव आणि केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या संकटात सेवा करताना मिळालेला अनुभव यामुळे डॉ. आदित्य लाल यांना नायडू रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. डॉ. लाल यांनी रुग्ण सेवा करताना आणखी काही स्वयंसेवक आणि डॉक्टरांच्या पथकाशी संपर्क साधला. त्यावेळी डॉ. प्रसून मिश्रा आणि डॉ. रविशा मोरे हे दोघे न डगमगता रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. 

सध्या मास्कची गरज पाहता डॉ. लाल यांनी अमेरिकेतील डॉक्टरांनी साथीच्या आजाराशी झुंज देणारी मास्कची रचना ऑनलाइन शोधली. त्यांनी या रचनेचा वापर करून मास्क तयार करण्याबाबत स्कायझेन टेकच्या दोन अभियंत्यांशी सल्लामसलत केली. सत्यजित भास्करे आणि सरबजीत रतन या दोन अभियंत्यांनी 3 डी प्रिंटरचा वापर करून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. डी. बी. कराळे यांनी मोफत देणगी स्वरूपात फिल्टर्स दिले. 3 डी प्रिंटेड डिझाइन मास्क पारंपारिक एन 95 मास्कसारखे आहे. मास्क आणि फिल्टर निर्जंतुकीकरण, स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात, असे डॉ. लाल यांनी सांगितले.

'बग स्निफर': वेगाने बॅक्टेरिया शोध घेणारे यंंत्र ; पुण्यातील 'या' स्ंस्थेने केली निर्मिती

नायडू रूग्णालयात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी डॉ. सुधीर पास्तुटे यांच्यासह तरूण ब्रिगेड त्यामध्ये डॉ. स्वप्निल पठाडे, डॉ. नम्रता चंदनशिव, डॉ. क्षितीज देशमुख, डॉ. रश्मी गायकवाड, डॉ. भारती शितोळे, डॉ. सारंग काळेकर, डॉ. शुभम शॉ यांच्यासह अन्य डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्वजण वैयक्तिक जोखीम स्वीकारून रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णसेवा करीत असतानाच सामाजिक भान ठेवत मास्क निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. लाल आणि डॉ. रविशा यांनी सांगितले.

पुण्यात गोंधळ; कोरोनाबाधित आणि तपासणीला आलेले एकाच ठिकाणी

कोरोनाशी लढा देत असलेलेसर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी हे लढाऊ सैनिकांपेक्षा कमी नाहीत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपण हे मास्क मोफत उपलब्ध करून देणार आहोत. 
-  डॉ. आदित्य लाल

फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगली हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

SCROLL FOR NEXT