jobs.jpg 
पुणे

पुण्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी: वाचा महत्त्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि टाळेबंदी यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 'क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दलच्या 'कुशलता' या एका मोठ्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुमारे सुमारे ५० हजार बेरोजगार तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती 'क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, " क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अमर मांजरेकर आणि अनिल फरांदे यांनी हा उपक्रम विकसित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. सदर उपक्रम हा 'कुशल क्रेडाई'च्या माध्यमातून राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील एक हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत पहिले प्रशिक्षण शिबिर पुणे शहरात घेण्यात येईल व त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारची शिबीरे ताळेबंदी उठल्यानंतर घेण्यात यावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू. बांधकाम क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही राज्यातील विविध पातळीवरच्या स्थानिक प्रशासनाची मदत घेऊ."

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 


याविषयी बोलतांना 'कुशल क्रेडाई'चे प्रमुख जे. पी. श्रॉफ म्हणाले, "कुशल क्रेडाईच्या माध्यमातून आजवर ३५ हजाराहून अधिक बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा प्रदीर्घ अनुभव आम्हाला 'कुशलता' हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. या आधी इतर क्षेत्र काम करत असलेल्या कामगारांना बांधकाम क्षेत्रात यायचे असल्यास हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते व त्यामुळे त्याला बांधकाम क्षेत्रात सामावून घेणे सोपे होईल. सदर प्रशिक्षण शिबिरासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच प्रशिक्षणार्थींची राहण्याची आणि जेवणाची सोय  देखील ठेकेदारांतर्फे करण्यात येईल अशी योजना असल्याचे श्रॉफ यांनी नमूद केले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे मानद सचिव आदित्य जावडेकर म्हणाले की, आजमितीला पुणे आणि लगतच्या परिसरात विकसित होत असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांवर सुमारे ५० हजार कुशल बांधकाम कामगारांची गरज आहे. त्यामुळे कुशलता उपक्रमांतर्गत प्रशिक्षित होणाऱ्या कुशल कामगारांना लगेचच रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यात प्रशिक्षणाबरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी देखील 'क्रेडाई पुणे मेट्रो' कार्यरत असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांनी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा. या संबंधीचा अधिक तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT