पुणे

विश्‍वासर्हतेचे निर्देशांक सहा महिन्यांपासून प्रसिद्ध नाही;वीज नियामक आयोगाच्या आदेशाला महावितरणकडून हरताळ

सकाळवृत्तसेवा

पुणे - "महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने विश्‍वासर्हतेचे निर्देशांक दरमहा प्रसिद्ध करणे महाविरणला बंधनकारक केले आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून महावितरणकडून ते प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. महावितरणला या ढिसाळ कारभारात तातडीने सुधारणा करून दरमहा ते प्रसिद्ध करण्याचे आदेश द्यावेत,' अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयोगाकडे केली आहे. 

आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्‍वासर्हतेचा निर्देशांक प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. यातून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर जून 2020 नंतर हे निर्देशांक केलेले नाहीत, असे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. 

जून 2020 या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 16 हजार 180 घटना घडल्या. ज्यामधे राज्यातील 4 कोटी 54 लाखाहून अधिक नागरिकांना एकूण 23 हजार 115 तास अंधारात बसावे लागले. तर डिसेंबर 2019 या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 10 हजार 994 घटना घडल्या ज्यामधे राज्यातील अडीच कोटी हून अधिक नागरिकांना एकूण 15 हजार 167 तास अंधारात बसावे लागले, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे. 

स्मार्ट सिटीही अंधारच अंधार 
महाराष्ट्रात महावितरणला सर्वांत जास्त महसूल मिळवून देणाऱ्या आणि स्मार्ट सिटी असलेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. डिसेंबर 2019 मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या 713 घटना घडल्या. ज्यात पुणेकरांना 889 तास अंधारात बसावे लागले .तर जून 2020 मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या 1 हजार 524 घटना घडल्या. ज्यात पुणेकरांना 2 हजार 350 तास अंधारात बसावे लागले. यातून डिसेंबर 2019 पेक्षा जून 2020 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना अंधारात बसावे लागण्याच्या घटना आणि कालावधी यात दीड पटीने वाढ झाली आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT