crime bribe case anil ramod More than 47 lakh in account of Ramod family Information from CBI sakal
पुणे

Dr. Anil Ramod : रामोड कुटुंबीयांच्या खात्यात ४७ लाखापेक्षा जास्त रक्कम; सीबीआयची माहिती

सीबीआयची न्यायालयात माहिती, लाच प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने असलेल्या १७ बँक खात्यांमध्ये ४७ लाखापेक्षा अधिक रक्कम असल्याचे प्रथमदर्शी तपासात समोर आले आहे. तसेच अटक केल्यानंतर डॉ. रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र ते तपासास सहकार्य करत नसल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयास दिली.

सीबीआय कोठडीची मुदत संपत असल्याने डॉ. रामोड यांना मंगळवारी (ता. १३) सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीसाठी सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये सीबीआयने ही माहिती न्यायालयास दिली. तपासादरम्यान डॉ. रामोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.

रामोड कुटुंबीयांच्या नावे बँकेत असलेली रक्कम कुठून आली? त्यांची आणखी कुठे बेकायदेशीर मालमत्ता व रक्कम आहे का? याची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. आरोपीचे कार्यालय व इतर ठिकाणाहून पुरावे जमा करायचे असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची

विनंती सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयास केली. त्यानुसार सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी रामोड यांना २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे रामोड याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. डॉ. रामोड यांच्या जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती त्यांचे वकील सुधीर शहा यांनी दिली.

पत्नीच्या नावावर कंपनी

तपासादरम्यान सीबीआयला डॉ. रामोड यांची पत्नी विजयालक्ष्मी रामोड यांच्या नावावर असलेल्या कंपनीची कागदपत्रे मिळाली आहेत. वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रा. लि. असे या कंपनीचे नाव आहे. मिळालेल्या कागदपत्रांनुसार ही कंपनी विजयालक्ष्मी यांच्या नावावर नोंदलेली असल्याचे सीबीआयने न्यायालयास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT