Crime
Crime 
पुणे

सरकारी कामात अडथळा; नगरसेवकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तळजाई टेकडीवर वाहनांसाठी पार्किंग व त्यावरील सोलर पॅनेल प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जगताप यांच्यासह त्यांच्या सात ते आठ कार्यकर्त्यांविरुद्ध सहकारनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तळजाईवरील क्रिकेटच्या मैदानासमोर महापालिकेच्या वतीने पार्किंग व त्यावर सोलर पॅनेल प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या पाहणीसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी सकाळी टेकडीवर आले होते.

तळजाई टेकडीवर सौरऊर्जा प्रकल्पाच्या पाहणीसाठी  आलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुभाष जगताप व कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
- अनिल शेवाळे, पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT