Pune crime news  esakal
पुणे

Pune Crime: माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी

'३० लाखांची खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारू'

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime: काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना ३० लाख रुपये खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसांत शहरातील काही प्रमुख राजकीय व्यक्तींना खंडणीसाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अविनाश रमेश बागवे (रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बागवे यांना चार एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आणि सायंकाळी सहाच्या सुमारास एका व्हाट्सअप कॉलवरून ३० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. (Latest Marathi News)

पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारू तसेच राजकीय जीवन उध्वस्त करू असा मेसेजही पाठविला. त्यानंतर बागवे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून एका बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनाही २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला. (Marathi Tajya Batmya)

तसेच, यापूर्वी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलालाही बनावट मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. व्हाट्सअप कॉल करण्यासाठी गुन्हेगारांकडून चोरीचे मोबाईल सिमकार्ड वापरण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT