Crime
Crime 
पुणे

पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; पोटच्या मुलीशी अश्‍लील चाळे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नी कामाला गेल्यावर घरी एकटी असलेल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.

संबंधित मुलीच्या आईनेच याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ जून २०१४ आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. फिर्यादी या कोथरूड परिसरात त्यांचा पती, दोन मुली आणि मुलासह राहात. त्यातील सर्वात लहान मुलीवर अत्याचार झाले आहेत. फिर्यादी या घरकाम करतात. रात्रीच्या वेळी आणि पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करीत. तिला घरीच थांब असे म्हणत असत.

फिर्यादीला तीन महिन्यापासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपणा जाणवला. त्यावेळी विश्‍वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली. यावेळी घडलेला प्रकार समोर आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एका एनजोआच्या मदतीने पोलिसात फिर्याद दिली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT