crime news police arrest who tease young girls youth pune women safety Sakal
पुणे

.. जेव्हा तरुणींना "चलो बैठो घुमने जाते" म्हणणाऱ्यांना पोलिसांनी घडविली "लॉक अप"ची गारेगार सफर !

अवघ्या एका तासातच कारमधील तरुणांचा शोध घेऊन पोलिसांनी घडविली अद्दल, पुणे पोलिसांच्या "ट्विट"वर नेटकरी "खुश"

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नेहमीप्रमणेच मुली सायंकाळी हॉस्टेल बाहेर रस्त्याने जात होत्या. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारमधील तरुणानी त्यांना "चलो बैठो घुमने जाते" असा आवाज दिला. घडलेला प्रकार तरुणींनी पोलिसांना सांगितला, आणि अवघ्या तासातच त्या बहाद्दरांचा शोध घेऊन त्यांची फिरायला जाण्याची "छोटीशी ख्वाईश" पोलिसांच्या "लॉक अप" अखेर पूर्ण झाली ! अशा पद्धती तरुणीची छेड काढणाऱ्या पोलिसांनी चांगलाच "खाक्या" दाखविला. कोथरूड येथे अनेक शिक्षण संस्था आहेत. या संस्थांच्या आसपासच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये वास्तव्य करतात. या ठिकाणी विद्यार्थी - विद्यार्थिनीचा मोठ्या प्रमाणत वावर सुरू असतो. त्यामुळे या परिसरात टवाळखोर तरुणांचे ग्रुप अनेकदा बसलेले असतात. तर काही जण दुचाकीवर "ट्रिपल सीट" बसून फेऱ्या मारत फिरत असतात.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथीलच एका हॉस्टेल बाहेर तेथील 3 तरुणी आल्या होत्या. नेमके त्याच वेळी दोघेजण एका कारमध्ये बसले होते. त्यांनी तरुणीकडे पाहून "चलो बैठो घुमने जाते" असा आवाज दिला. या प्रकारामुळे तरुणी काहीशा भांबवल्या. तरीही त्यांनी धीर राखत तेथून गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, पोलिसांनी ही घडलेल्या प्रकारची तात्काळ आणि गांभीर्याने दाखल घेतली..तरुणींनी टवाळखोर तरुणाच्या कारचा नंबर लक्षात ठेवला होता. पोलिसांनी हा नंबर घेऊन अवघ्या एक तासातच त्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई करून तरुणांच्या फिरायला जाण्याचा आवडीनुसार त्यांना "लॉक अप" च्या थंडगार वातावरणाची सफर घडविली. या प्रकारामुळे तरुणांना आपल्या शब्दांचे आणि कृतीचे महत्त्व चांगलेच उमगले.

• "ट्विटर"चा "ट्विस्ट" भलताच भारी !

तरुणी बाबत घडलेल्या या प्रकारची खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही चांगलीच दाखल घेत त्याबाबत मजेशीर ट्विट केले. विशेषत: पुणे पोलिसांच्या ट्विटरवर याबाबत एक भन्नाट "ट्विट" टाकण्यात आले. त्यामध्ये "चलो बैठो घुमने जाते" असे दोघांनी तरुणींना बोललेले "कॅज्युअल" शब्द, पुणे पोलिसांनी कॅज्युअली" घेतलेच नाहीत.पोलिसांनी कार शोधली आणि त्यांना पोलिस लॉकअप मध्ये पाठविले. "This is #Pune. Eve-teasing in any form will land you in big trouble" अशा शब्दात त्यांची खास बोळवण हि केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsath Video: पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Ujani Dam: 'उजनी धरणात ११४ टीएमसी पाणीसाठा'; २० हजार क्युसेकची आवक, भीमा नदीत सोडला १६ हजारांचा विसर्ग

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT