crime news in pune pimpari
crime news in pune pimpari 
पुणे

सराईत सोनसाखळी चोरांकडून 40 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) - मध्यप्रदेशमधून वाकड पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत सोनसाखळी चोरांकडून 40 तोळे सोन्याचे दागिने व एक मोटार असा 16 लाख 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे उपस्थित होते.

विजय ऊर्फ छल्या गोपीनाथ चव्हाण (वय 48, रा. अशोक नगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर), गोविंद लाडू काळे (वय 28) व शिवा किसन पवार (वय 27, दोघेही रा. परतूर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांचे दोन साथीदार सोमनाथ चोबे व सुनील पवार यांचा पोलिस शोध घेत आहेत. तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ व छल्या हे त्यांच्या साथीदारांसह मध्यप्रदेशमध्ये राहत असल्याची खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. त्या अनुशंगाने तीन पथके तयार करून अहमदनगर, पुणे जिल्हा व मध्यप्रदेशमध्ये पथक रवाना झाले.

छल्या, गोविंद व शिवा यांना मध्यप्रदेशमधून अटक करून त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर वाकड, हिंजवडी, सांगवी, निगडी, पिंपरी, चतुःश्रृगी व भोसरी पोलिस ठाण्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस आहे. त्यांच्याकडून 401 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटार असा 16 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

छल्या टोळीचे वैशिष्टे 
मंगल कार्यालय यांचे चोरीचे आवडते ठिकाण असून किमान 7 ते आठ तोळ्याचे गंठण ते शोधत असत. तसेच या टोळीमध्ये मध्यप्रदेशमधील सदस्य असून दक्षिण भारतात सोने वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथील राज्ये त्यांचे कार्यक्षेत्र बनले आहेत. 

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, पोलिस हवालदार विवेकानंद सपकाळे, जावेद पठाण, प्रमोद कदम, श्‍याम बाबा, नितीन गेंगजे, दादा पवार, धनराज किरनाळे, सुरेश भोसले, अशोक दुधवणे, हनुमंत राजगे, बिभीषण कन्हेरकर, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, विक्रम कुदळ, विजय गंभिरे, अनिल महाजन, महंमद नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, सागर सूर्यवंशी, मधुकर चव्हाण, सनी गोंधळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT