पुणे

जेजुरी येथील जबरी चोरीचा गुन्हा 48 तासांच्या आत उघडकीस; दोघांना अटक

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : कोथाळे (ता. पुरंदर) येथील दोन उस तोड कामगारांना चाकुचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाघापूर (चौफुला) येथून सोमवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. लुटमारीचा प्रकार शनिवारी (ता. २०) मध्यरात्रीच्या सुमारास कोथाळे ग्रामपंचायत हद्दीतील जगतापवस्ती येथे घडला होता. अमोल मखन पवार (वय २१, रा.राजेवाडी, शिवनगर पाटी, ता. पुरंदर) व तेजस देवा शिंदे (वय २० रा. शिंदवणे, पांचाळा वस्ती ता. हवेली) ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांची नावे असून, वरील दोन्ही आरोपींना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कोथाळे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील जगतापवस्ती येथील निलेश सुनील खंडागळे (वय 24) व अक्षय मारुती गवारे (वय 28, रा. दोघेही रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड) या दोन ऊसतोडणी कामगारांना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून, दोन मोबाईल फोन व दीड हजार रुपये रोख असा सुमारे साडेसतरा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी जेजुरी पोलिसांत गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलिसांच्याबरोबरच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही सुरु केला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वरील प्रकरणातील दोन संशयित सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाघापुर-चौफुला परीसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार अमोल गोरे, हवालदार चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत व गुरु गायकवाड यांनी चौफुला परीसरात साफळा रचला होता. यात अमोल पवार व तेजस शिंदे हे दोन्ही आरोपी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अलगद अडकले.

खंडणी व जबरी चोरी प्रकरणातील राजगड पोलिसांना हवा असलेला आरोपीही पोलिसांच्या ताब्यात- खंडणी व जबरी चोरी प्रकरणात राजगड पोलिसांना हवा असलेला गजानन जिवराज कदम (वय 32 रा. नसरापूर ता. भोर) या अट्टल गुन्हेगारालाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास नसरापुर येथून ताब्यात घेतले आहे. गजानन कदम याच्यावर भारतीय दंड विधान कलम 386, 392 आर्म अक्ट 3(25) नुसार सोमवारी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. गजानन कदम हा अट्टल गुन्हेगार असल्याने, आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे फौजदार अमोल गोरे, निखील मगदूम, पोलिस नाईक सागर चंद्रशेखर, 
अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले व संतोष दावलकर या सर्वांनी नसरापुर भागात लक्ष केंद्रित केले होते. यात पोलिसांना यश आले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT