पुणे

पुणे : सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

निलेश बोरुडे

किरकटवाडी : अंमली पदार्थ विक्री करणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून खडकवासला येथून गावठी पिस्तूल व एका जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. शिवम आनंत बरिदे (वय.21, रा. खडकवासला ता. हवेली जि. पुणे) असे सदर सराईताचे नाव आहे.

सिंहगड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना शिवम बरिदे या सराईत गुन्हेगाराकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर खडकवासला परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून बरिदे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. आरोपी शिवम बरिदे यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख व लक्ष्मण राऊत यांच्या पथकाने केली. कारवाईसाठी तांत्रिक मदत सायबर क्राईम पोलीस स्टेशनचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पावसाने पुन्हा दाखवला ‘आपला जोर’! रेल्वे रुळांवर ११ इंच पाणी; प्रवासी अडकले अन् स्टेशनवर मोठी गर्दी

India Squad For Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ शिलेदार, पूर्ण लिस्ट

China-India: चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीहून इस्लामाबादला जाणार; नेमकं कारण काय?

Video : 'मी सांगितलेला होमवर्क केलास काय रे?' पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी साधला संवाद, मिळालं एकदम भारी गिफ्ट..

Viral Video : प्रियकरासोबत जाण्याचा प्लॅन चॅटजीपीटी मुळे धुळीस; महिलेला कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT