Crisis of water scarcity in 522 villages in the district 
पुणे

पुणे जिल्ह्यातील ५२२ गावांच्या डोक्यावर पाणीटंचाईचे संकट!

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील ५२२ गावे आणि १ हजार ८७९ वाड्यावस्त्यांच्या डोक्यावर पाणीटंचाईचे संभाव्य संकट आहे. ही गावे आणि वाड्यावस्त्यांमधील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने ३८ कोटी ३ लाख ८९ हजार रुपयांचा पुरवणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंजुरी दिली आहे.

या आराखड्यात टंचाई निवारणासाठीच्या विविध उपाययोजनांची मिळून एक हजार ८७४ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रमुख उपाययोजनांमध्ये नवीन विंधन विहीर खोदणे, प्रस्तावित नळ पाणी योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, टॅंकर आणि बैलगाडीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, खासगी विहिरींचे अधिगृहण करणे, विहिरींमधील गाळ काढणे या प्रमुख सात उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ७६ गावे ५३१ वाड्यावस्त्यांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, ५४ गावे व ५७ वाड्यावस्त्यांसाठी खासगी विहिरींचे अधिगृहण करणे, ४६ गावे व ३६ वाड्यांमधील विहिरीतील गाळ काढणे, १४४ गावे व ७९० वाड्यांमध्ये नवीन विंधन विहीरी खोदणे, १४४ गावे व १४५ वाड्यांमधील प्रस्तावित नळ पाणी योजनांची विशेष दुरुस्ती करणे, ४० गावे आणि २७६ वाड्यांमधील नादुरूस्त विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, आणि १८ गावे ४४ वाड्यावस्त्यांमध्ये तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे आदी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

चहासाठी घरात आली आणि दागिने लुटून गेली!

संभाव्य कामांची संख्या (कंसात प्रस्तावित तरतूद रुपयांत)

  • नवीन विंधन विहीरी -९३४ (५ कोटी ७ लाख २५ हजार)
  • पाणी योजनांची विशेष दुरुस्ती- २८९ (२३ कोटी ५३ लाख ९६ हजार)
  • विंधन विहीरी दुरुस्ती- ३१६ (७६ लाख ७६ हजार)
  • तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना- ६२ (५ कोटी १८ लाख)
  • टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे -९२ (१ कोटी ३८ लाख)
  • विहिरींचे अधिगृहण करणे- ९९ (४७ लाख ४२ हजार)
  • विहिरींमधील गाळ काढणे -८२ (१ कोटी ६२ लाख)

''जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी टंचाई आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या संभाव्य टंचाई कामांचे सर्वेक्षण चालू आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या कामांच्या आवश्यक त्या मंजुऱ्या घेण्यात येणार आहेत.  सध्या जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई नाही. त्यामुळे येत्या मार्चएप्रिलमध्ये ही कामे सुरु होतील. सध्या टँकर मागणीचा एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.''
सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

SCROLL FOR NEXT