uni 
पुणे

महत्वाची बातमी : विद्यापीठांच्या परिक्षा होणार की नाही?

ब्रिजमोहन पाटील

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे विद्यापीठांच्या स्वायत्तेवर आक्रमण करत असून, परीक्षा द्यावी की न घ्यावी हा विद्यापीठांचा अधिकार आहे. विद्यापीठांनी सर्व नियमांचे पालन करून या परीक्षा घ्यावात अशी मागणी विद्यापीठ विकास मंच व रिपाइं विद्यार्थी आघाडीने केली आहे.

कोरोनामुळे स्थिती गंभीर असल्याने अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता ग्रेड देऊन पास करावे अशी भूमिका सामंत यांनी घेतली आहे. मात्र, पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व अन्य अखिल भारतीय मानक संस्थांच्या मार्गदर्शक तत्वा नुसार घेता येऊ शकतात. या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यास भविष्यातील करिअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर 'कोरोना बॅच'चे विद्यार्थी असा शिक्का बसण्याची शक्यता असून यामुळे त्यांना नोकरी किंवा पुढील प्रवेश तसेच बँक लोन मिळण्यासाठी अडचणी येतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान त्यामुळे मागासवर्गीय आणि इतर सर्व र्विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वसमावेशक योजना करणे गरजेचे आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये आणि परीक्षा शुल्क घेऊ नये अशी मागणी विद्यापीठ विकास मंचाचे प्रा. धनंजय कुलकर्णी,  रिपाइं विद्यार्थी आघाडीचे राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

विद्यापीठ परीक्षेबाबात सामंत यांनी 'यूजीसी'ला पत्र पाठविल्यानंतर राज्यात राजकारण सुरू आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लवकर परीक्षेबाबात निर्मण घ्या असे निर्देश दिले. परीक्षा रद्द करण्यावरून कुलगुरूही नाराज आहेत.

त्यामुळे सोमवारी सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेऊन दोन तीन दिवसात परीक्षा कशा घेऊ शकतो याचा आराखडा तयार करून सादर करावा अशा सूचना कुलगुरूंच्या समितीला दिल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT