farmer 
पुणे

१ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरूवात; सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास १ एप्रिलपासून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ दिला जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सोमवारी (ता.१३) सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गामुळे अग्रणी बॅंकेकडून अद्याप खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. येथल्या आठवडाभरात ते मिळू शकेल. मात्र गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेला सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात बॅंकेला यश आले होते, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

पीककर्ज हे अल्प  मुदतीचे असते. त्यामुळे दरवर्षी ३१ मार्चपर्यंत या कर्जाची परतफेड करणे बंधनकारक असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने या कर्जाच्या परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे केवळ ३१ मार्चच नव्हे तर येथल्या ३० जूनपर्यंत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही खरीप पीककर्जाचा लाभ मिळू शकणार आहे. पुणे जिल्हा बॅंकेमार्फत तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT