Mobile App Sakal
पुणे

मोबाईल ॲपद्वारे पिकांची होणार नोंद

राज्यातील कोणत्या भागात कोणते पीक घेतले आहे, याची अचूक माहिती आणि आकडेवारी मिळणे सहज शक्य होणार आहे. कारण, पिकांची नोंद मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील कोणत्या भागात कोणते पीक (Crop) घेतले आहे, याची अचूक माहिती आणि आकडेवारी मिळणे सहज शक्य होणार आहे. कारण, पिकांची नोंद (Registration) मोबाईल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून घेण्यात येणार आहे. खरीप हंगामापासून हा प्रयोग राबविण्यास राज्य सरकारने (State Government) मान्यता दिली आहे. (Crops will be Registered through Mobile App)

शेतकरी शेतावर जाऊन ई-पीक पाहणीचा फोटो मोबाईल ॲपद्वारे अपलोड करू शकणार आहे. या मोबाईल ॲपमध्ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे.

तलाठ्याकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून, त्यानंतर शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेतली जाणार आहे. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली.

गाव नमुना सात म्हणजे मालकी हक्काचा अभिलेख, तर गाव नमुना १२ मध्ये पिकाच्या नोंदीचा अभिलेख या दोन्ही मिळून सातबारा उतारा तयार होतो. गाव नमुना नंबर १२ मधील पिकांच्या नोंदी तलाठ्याकडून घेतल्या जातात. अनेकदा त्यामध्ये त्रुटी असतात.

आता गावपातळीवरच पीकपेरणीची माहिती संकलित करणे, पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे या हेतूने ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टने मोबाईल ॲप विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प आठ जिल्ह्यातील २० तालुक्‍यांमध्ये राबविला होता.

काय फायदा होणार ?

  • राज्यात कोणत्या भागात कोणत्या पिकाची लागवड झाली, याची अचूक माहिती मिळणार

  • नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके किती पिकांचे नुकसान झाले, हे कळणार

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे सोपे जाणार

  • हमीभावानुसार अनुदान मिळण्यास मदत होणार

मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद नोंदविता येणार आहे. महसूल व कृषी विभागाने खरीप हंगामापासून हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘माझी शेती- माझा सातबारा, मीच लिहिणार- माझा पीकपेरा,’ असे ब्रीदवाक्‍य घेऊन हा प्रकल्प राबविणार आहे.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, ई-फेरफार प्रकल्प समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT