नवी सांगवी - पवनाथडी जत्रेच्या समारोपप्रसंगी लावणी सादर करताना कलाकार. 
पुणे

पवनाथडी जत्रेच्या समारोपाला गर्दी

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी - पवनाथडी जत्रेच्या समारोपप्रसंगी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जत्रेच्या पहिल्या दिवसांपासून विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी स्टॉलधारकांकडून सुरू होत्या. 

कोरोना संसर्गाची भीती आणि दहावी, बारावी परीक्षेच्या कालावधीतच जत्रेचे आयोजन केल्याने सुरुवातीचे दोन दिवस गर्दी नव्हती. मात्र, शनिवार (ता. ७) आणि रविवारी (ता. ८) सुट्यांमुळे नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शनिवारी एक व रविवारी दोन कोटींपेक्षा अधिक विक्री झाल्याचा दावा आयोजकांनी केला. तुलनेत पहिल्या तीन दिवसांत विक्रीचा आकडा जेमतेम ७५ लाख होता. 

जत्रेच्या समारोपाला जागतिक महिला दिनानिमित्त अक्षय घोळवे प्रस्तुत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सायंकाळी आयोजित केला होता. त्यात युगांती पारळे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर तुळजापूर येथील सुनीता हुडेकर या द्वितीय, तर सोनाली चौधरी यांना तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर सुजाता कांबळे प्रस्तुत लावण्यसुंदरी हा लावण्यांचा कार्यक्रम झाला. त्यात शीतल चोपडे, अंजली राजे, राही संगमनेर, साधना जोशी, बाळुमामा मालिका फेम स्वाती थोपटे यांनी एकापेक्षा एक सरस लावण्या सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. शुभांगी शिंदे व किशोर केदारी यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा बोदडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT