crowd bank 
पुणे

सलग सुट्ट्यांमुळे बॅंकांमध्ये नागरिकांची गर्दी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - सलग तीन दिवस बॅंकांना सुट्ट्यांनंतर सोमवारी (ता. 13) बॅंका उघडल्या. त्यामुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी शहरातील बॅंकांमध्ये गर्दी केली होती. 

बॅंकांना शुक्रवारी (ता. 10) "गुड फ्राय-डे'ची सुटी होती. शनिवारी (ता. 11), रविवारी (ता. 12) बॅंका बंद होत्या. त्यामुळे तीन दिवस नागरिकांना कोणतेही व्यवहार करता आले नाहीत. तसेच मंगळवारी (ता. 14) डॉ. आंबेडकर जयंतीची सुटी आहे. केंद्र सरकारने तीन महिने कर्जाचे हप्ते तात्पुरते भरले नाही तरी चालतील, अशी मुभा ग्राहकांना दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय संबंधित बॅंकांवर सोपविला आहे.

या बाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञांनी शक्‍यतो कर्जाचे हप्ते भरण्याचे आवाहन केले आहे. अनेकजण पहिल्या पंधरवड्यात कर्जाचे हप्ते भरतात. तसेच औषधे, किराणामाल, भाजी यासारख्या अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैशांची गरज असते. त्यामुळे नागरिकांनी बॅंकांबाहेर रांगा लावल्या होत्या. बहुतेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नागरिक पालन करताना दिसत होते. लॉकडाउनमुळे अनेक रिक्षा बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांची बॅंकेत येताना गैरसोय झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT