bhor mumbai 
पुणे

भोरच्या रस्त्यांवर मुंबईच्या गाड्यांची गर्दी    

विजय जाधव

भोर (पुणे) : लॉकडाउननंतर मुंबईहून भोर तालुक्यात आलेल्यांच्या मुंबई पासिंगच्या मोटारी व दुचाकींमुळे शहरासह तालुक्यातील सर्व रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. शहर आणि तालुक्यात मंबईहून आलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव सुरु झाला आहे. त्यामुळे अशा मुंबई पासिंगच्या  गाड्यांवर कारवाई करून शहरात येण्यास मनाई करण्याची मागणी भोरवासीयांनी केली आहे. 

पुण्या- मुंबईला नोकरी व व्यावसायानिमित्त कार्यरत असलेले अनेकजण लॉकडाउनमुळे भोर तालुक्यातील मूळ गावी आलेले आहेत. कुटुंबासह आणि पाहुण्यांसह ते आपल्या मोटारी, रिक्षा आणि दुचाकीवरून तालुक्यात आले आहेत. अनेकांना क्वारंटाइनदेखील केलेले आहे. परंतु, क्वारंटाईन केलेले असले नसले तरीही कित्येक जण भाजीपाला व इतर साहित्याच्या खरेदीसाठी दररोज भोर शहरात येत आहेत. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भोर शहरातील दुकाने उघडी असल्यामुळे या कालावधीत एसटी स्टँड, चौपाटी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, न्यायालयासमोर, नवी आळी आणि सम्राट चौकात वाहनांची गर्दी होत आहे. त्यात सर्वाधिक गाड्या ह्या मुंबई पासींगच्या असल्याचे निदर्शनास आले.  

मुंबईहून पुरेसे पैसे घेऊन गावी आल्यामुळे सर्वांकडूनच नसली तरी अनेकांकडून दररोज पैशांची उधळपट्टी सुरु आहे. अनेक जण फक्त मद्य आणि मांस, मासे आदी पदार्थ खरेदी करण्यासाठी भोरमध्ये येत आहेत. त्यांच्या गाड्या या एसटी स्टँडवर उभ्या केलेल्या असतात. पन्नास गाड्यांपैकी २५ ते ३० गाड्या या मुंबई पासिंगच्या आढळल्या जात आहेत.

भोर तालुक्यातील एसटी सेवा बंद असल्यामुळे मुंबईहून आलेले काही वाहनचालक प्रतिष्ठेसाठी गावातील इतर नागरिकांनाही गाडीत बसवून भोरला येऊ लागले आहेत. गाडीत कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे मुंबई पासिंगच्या वाहनांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT