Drama
Drama 
पुणे

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक कलेचे नियोजन व्हावे

सुहास जोशी

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणारी ५१वी हौशी मराठी नाट्यस्पर्धा शुक्रवारपासून (ता. १५) सुरू झाली आहे. सातत्याने ५१ वर्षे ही स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. राज्यात एकाच वेळी एकूण २० केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त....

या स्पर्धेत प्रत्येक केंद्रावर साधारणपणे २३ ते २४ नाटके सादर होतात. त्यानुसार एकूण ४८० नाटके सादर होणार आहेत. विशेष म्हणजे नाट्यपरिषद आणि रंगकर्मी यांच्या प्रयत्नातून सात ते आठ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडला हे स्पर्धा केंद्र मिळाले. त्यामुळे या शहराची सांस्कृतिक तहान भागली. या स्पर्धेत येणारी नाटके ही अतिशय दर्जेदार असतात. त्यांचे प्रवेशमूल्यही नगण्य असते. त्यांच्यामागे प्रसिद्धीचे वलय नसले, तरी त्यांची गुणवत्ता कमी होत नाही. 

शहराचा सांस्कृतिक वारसा 
पिंपरी-चिंचवड शहराला सांस्कृतिक वारसा आहे. १९५५ ते ६०च्या दशकात चिंचवडमध्ये चिंचवड विकास मंडळ ही संस्था आताची चिंचेची तालीम किंवा मोरया समाधी मंदिराजवळ चिंचेच्या झाडाखाली गॅसबत्तीच्या उजेडात नाटके सादर करीत होती. संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, महासाधू मोरया गोसावी अशा संतांचा शहराला परिसस्पर्श लाभलेला असूनही म्हणावी तशी प्रसिद्धी लाभलेली नाही. अनेक संस्था आपापल्या परीने सांस्कृतिक वारसा जपत होत्या. शहरात १९९५ च्या सुमारास नाट्यपरिषदेची स्थापना झाली.

भाऊसाहेब भोईर आणि दत्ता मिरजकर या कलाप्रेमी आणि ध्येयवेड्या तरुणांनी अशा सर्व संस्थांना एकत्र करून १९९९ मध्ये शहरात अखिल भारतीय नाट्यसंमेलन भरविले. त्याद्वारे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसा जपला. त्याचे वैशिष्ट्य असे, की या नाट्यसंमेलनातील बालनाट्यास पूर्ण एक दिवस देऊन वेगळा विक्रमच केला. यामध्ये सुमारे ४५ शाळांनी सहभाग घेऊन कला सादर केली होती. त्यानंतर नादब्रम्ह, वसंतराव देशपांडे फाउंडेशन, गायन समाज आणि अथर्व थिएटर्स अशा संस्थांनी ही चळवळ रुजविली. गेली १८ वर्षे नाट्यपरिषद सातत्याने कै. गडकरी करंडक एकांकिका स्पर्धा घेत आहे. त्यास संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळतो.

त्यात कमीतकमी ३५ संघ सहभागी होत असतात. नाट्यपरिषद व रंगकर्मीच्या प्रयत्नातून २०१२ पासून शहराला नाट्यस्पर्धेचे रूप प्राप्त झाले. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक चळवळीत मानाचा तुरा रोवला. परिणामी पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक नगरी न राहता सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. 

पुण्यातील सुदर्शन रंगमंच हे हौशी प्रायोगिक कलाकारांचे दालन होते. ती उणीवसुद्धा प्रभाकर पवार या कलासक्त तरुणाने रंगमंच उभारून भरून काढली. त्याद्वारे शहरातील सर्वच क्षेत्रातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. महापालिकाही कलासागर महोत्सव, नाट्यजल्लोष असे कार्यक्रम करून आपले योगदान देत असते. तरीदेखील रंगकर्मींना एकत्र आणून एक सांस्कृतिक समिती स्थापून त्याद्वारे शहराच्या सांस्कृतिक कलेचे नियोजन व्हावे. महापालिकेने प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक हॉल, क्रीडासंकुल तयार केले आहेत. त्याचे नियोजन जर या सांस्कृतिक समितीतर्फे झाल्यास या शहराचा सांस्कृतिक विकास होण्यास वेळ लागणार नाही. या राज्यस्पर्धेच्या निमित्ताने रंगकर्मी व कलाप्रेमी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी विचारमंथन करून थोडी दिशा दिली, तर भविष्यात पिंपरी-चिंचवड हे शहर नक्कीच सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाईल. तशी मानसिकता सर्व रंगकर्मी कलाकार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची व्हावी, हीच यानिमित्त इच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT