Indian Students Sakal
पुणे

संचारबंदी शिथिल होताच, युक्रेनच्या सीमा ओलांडा आणि बाहेर पडा; भारत सरकारच्या सूचना

युक्रेनमधील प्रत्येक शहरातील युद्धाची परिस्थिती वेगवेगळी आहे. तेथील शहरनिहाय संचारबंदी शिथिल होण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

युक्रेनमधील प्रत्येक शहरातील युद्धाची परिस्थिती वेगवेगळी आहे. तेथील शहरनिहाय संचारबंदी शिथिल होण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

पुणे - युक्रेनमधील (Ukrain) प्रत्येक शहरातील युद्धाची (War) परिस्थिती वेगवेगळी आहे. तेथील शहरनिहाय संचारबंदी (Curfew) शिथिल होण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) ते वास्तव्यास असलेल्या शहरातील संचारबंदी शिथिल होताच, युक्रेनच्या सीमा (Border) ओलांडा आणि तेथून बाहेर पडा, असा सूचना (Suggestions) भारत सरकारने (Indian Government) तेथील भारतीय विद्यार्थ्यांना (Students) दिल्या आहेत. शिवाय भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी युक्रेन लगतच्या चार युरोपीय देशांमध्ये भारत सरकारकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V Muraleedharan) यांनी बुधवारी (ता.२) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्धाची तीव्रता वाढली आहे. या युद्धामुळे उच्च शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले भारतीय विद्यार्थी तेथेच अडकून पडले आहेत. यामुळे भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी आणण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. दिशा समितीच्या बैठकीसाठी व्ही. मुरलीधरन हे बुधवारी पुण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘तेथील संचारबंदी शिथिल होताच युक्रेनची सीमा ओलांडा, अशा सूचना दिल्या असून, त्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या पूर्वेकडे न जाता पश्चिम सीमेकडे जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या सर्व नियंत्रण कक्षांचा पत्ता, संपर्क क्रमांक युक्रेनमधील भारतीयांना देण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांसाठी भारतीय दुतावासाकडून वेळोवेळी स्थानिक परिस्थिती पाहून मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला जात आहे. किव्ह, खारकीव शहरातील परिस्थिती गंभीर असल्याने विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा लागत आहे. व्यावसायिक विमानांची क्षमता कमी पडत असल्याने आता हवाई दलाच्या विमानांची मदत घेतली जाणार आहे.’

‘भारतीयांचा लगतच्या देशांत आसरा’

युक्रेनमधील भारतीयांनी पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया अशा लगतच्या देशांमध्ये आसरा घेतला आहे. या ठिकाणी भारतीय दूतावास कार्यालयाकडून संबंधितांच्या निवारा, भोजनाची सोय करण्यात आली आहे. या भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणण्यात येत आहे. सात हजार भारतीय नागरिक अद्यापही युक्रेनच्या पूर्वेला खारकिव, सुमी या शहरांत अडकून पडले आहेत. त्यांना युक्रेनच्या सीमेबाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे भारतीयांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, युक्रेनमध्ये पाल्य असलेल्या पुण्यातील पालकांशी आज चर्चा केली. तेथील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षा चालू होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना २४ फेब्रुवारीपूर्वी युक्रेन सोडता आला नसल्याचे माहिती पालकांनी दिल्याचे व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT