ONLINE
ONLINE 
पुणे

'एका थाळीवर दोन थाळी फ्री'; फेक अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनो महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसून आहेत. याचा गैरफायदा घेत काही भामटे फेसुबकवर नामांकित हॉटेलच्या नावाने फेक अकाऊंट सुरु करुन ग्राहकांना आकर्षक योजनांची आमिषे दाखवत आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याच्या नावाखाली एटीएम व क्रेडीट कार्डची माहीती विचारुन बॅकेच्या खात्यातील रक्कम काढून फसवणूक केल्याच्या घटना घडू लागल्याने सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. (Customer fraud through fake accounts)

कोरोनो महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे हॉटेल सह सर्व दुकाणे बंद आहेत नागरिक घरात बसून आहेत. ऑनलाईन मार्केट व हॉटेलमधील पार्सल सुविधेला परवानगी आहे. त्यामुळे नागरिक एटीएम , क्रेडीट कार्ड व नेटबॅकींगचा वापर करुन ऑनलाईन पेंमेंट देऊन विविध हॉटेल मधील पदार्थ घरपोच मागवू लागले आहे. याचा गैरफायदा घेत काही भामटे सोशल मिडीयाचा वापर करत फेसबुक अथवा व्हाटस् अपच्या माध्यमातून नामांकित हॉटेल च्या नावाने फेक अकाऊंट सुरु करतात त्यावर एका थाळीवर दोन थाळी फ्री ( बाय वन थाळी गेट टू थाळी फ्री फर्स्ट वन ऑडर ) ही योजना फक्त प्रथम ऑडर साठी असल्याच्या आकर्षक जाहीरात करतात. काही ग्राहक या फसव्या जाहीरातीला बळी पडतात.

जाहीराती सोबत असलेल्या मोबाईल नंबर कॉल करतात. त्यावेळी समोरुन सांगितले जाते पार्सल पोहच झाल्यानंतर पेमेंट द्या. आम्ही पाठवलेल्या लिंकवर एटीएम अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फक्त दहा रुपये नोंदणी फी जमा करा ग्राहक त्या लिंक मध्ये एटीएम, क्रेडीट कार्डचा नंबर, एक्यपायरी तारिख, पीन नबंर टाकतो आणि काही वेळातच त्याच्या खात्यावरील रक्कम काढली जाते अशाप्रकारे ग्राहकांच्या फसणुकीचे प्रकार घडु लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी या फसव्या जाहीरातींना बळी पडण्यापासून सावध राहावे.

ग्राहकांनी नेहमी पदार्थांची ऑनलाईन ऑडर देताना त्या त्या हॉटेलच्या आधिकृत फोन नंबरवरफोनकरुन ऑडर द्यावी आम्ही कोणत्याही फसव्या जाहीराती करत नाही. आम्ही काही महीन्यापूर्वीच अशा फेक फेसबुक अकाऊंटच्या बाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, असं दुर्वांकुर डायनिंग हॉलचे संचालक शाम मानकर म्हणाले.

ग्राहकांनी ऑनलाईन ऑडर देताना बॅकेच्या एटीएम व क्रेडीट कार्डची माहीती कोणत्याही ऑनलाईन लिंक वर भरु नये किंवा फोनवर माहीती सांगू नये यामध्ये फसवणूक होऊन बॅक खात्यातील पैसे काढले जाण्याचा धोका असतो त्यामुळे ऑनलाईन पेंमेंट पाठवताना सावधगिरी बाळगावी, असं सेवानिवृत्त बॅक आधिकारी रामदास जाधव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT