पुणे

लोकेशनद्वारे सायबर पोलिसांनी केली दिल्लीतून अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - तब्बल चार राज्यांच्या सीमा भागात फिरून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीस सायबर पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपी व त्याच्या साथीदारांनी पेट्रोल पंपावरील डेबिट कार्ड मशिनमध्ये स्किमर बसवून अनेकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काढून घेतले होते. आता एकाला अटक केल्याने आरोपींची संख्या पाच झाली आहे.

गुड्डु ऊर्फ जितेंद्रकुमार अवधेश सिंग असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. लष्कर परिसरातील एका पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड स्वाईप मशिनला स्किमर बसवून अनेकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये काढले होते. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली. तर मुख्य आरोपी रोहित सिंग व गुड्डु हा पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

दरम्यान, सायबर पोलिस काही दिवसांपूर्वीच रोहित सिंग व गुड्डुचा शोध घेण्यासाठी बिहारमध्ये गेले होते. रेल्वेत बसल्यानंतर त्यांनी गुड्डचे मोबाईल लोकेशन शोधले. त्या वेळी तो बिहारहून दिल्लीच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिस दिल्लीमध्ये दाखल झाले. तेथे पुन्हा लोकेशन तपासले, तेव्हा तो हरियानातील गुरगाव येथे आढळला. आरोपीचा तीन वर्षांपूर्वीचा फोटो व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत होते. 

अखेर आरोपी दिल्लीतील द्वारका सेक्‍टर १९ येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुड्डुला अटक केली. त्याच्याकडे रोहित सिंग याच्याबाबत चौकशी केली. त्यानंतर तो राहात असलेल्या ठिकाणीही पोलिसांनी पाहणी केली. मात्र, तो पोलिसांच्या हाती आला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

SCROLL FOR NEXT