Crime_Cyber 
पुणे

सायबर चोरट्याचा पराक्रम; परस्पर कर्ज मंजूर करून घेत तरुणाला साडेचार लाखांना गंडवले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॅंकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून खात्याची माहिती घेऊन सायबर चोरट्याने परस्पर कर्ज मंजूर करून घेऊन तरुणाची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गोखलेनगर येथील एका 28 वर्षाच्या तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 ते 27 जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. 

ऍक्‍सिस बॅंकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचा फोन संबंधित तरुणाला आला होता. फोनवर बोलणाऱ्याने फिर्यादीला खात्याचे स्टेटमेंट देण्याचे आमिष दाखवून एक लिंक पाठविली. त्या लिंकमध्ये फिर्यादीला खात्याबाबतची माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन दिवसांनी फिर्यादी यांना चार लाख 62 हजार 539 रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून ती रक्कम खात्यात जमा केल्याचा मेसेज आला. मात्र, आपण कर्ज मागितलेच नव्हते, तर बॅंक परस्पर कशी कर्ज देणार, असे समजून फिर्यादी यांनी त्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले.

दुसऱ्या दिवशी फिर्यादींनी बॅंकेत जाऊन चौकशी केल्यावर त्यांना तुमच्या मागणीप्रमाणे चार लाख 70 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. त्यावरील प्रोसेसिंग फी आणि अन्य खर्च वजाकरून तुमच्या खात्यात चार लाख 62 हजार रुपये टाकण्यात आले आहे, असे बॅंकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादींनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला, पण तोपर्यंत सायबर चोरट्यांनी हे पैसे एका खात्यातून दुसऱ्या, तर दुसऱ्या खात्यातून इतर अनेक खात्यात पाठवून ते काढून घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

क्रेडिट कार्डचा पीन नंबर देण्याच्या बहाण्याने 61 हजारांना गंडा : 
क्रेडिट कार्डचा अद्यापपर्यंत वापर न केल्याने त्याचा पीन नंबर पाठवून ते सुरू करून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने एका महिलेच्या खात्यातून 61 हजार 574 रुपये चोरले. याप्रकरणी मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एस.बी.आय बॅंकेतून बोलत असल्याचा फोन फिर्यादी यांना 17 एप्रिल रोजी आला होता. आरोपीने फिर्यादींचे क्रेडिट कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने त्यांची खात्याची माहिती घेतली आणि त्याद्वारे 61 हजार 574 रुपये ऑनलाइन काढून घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT