Cyclone Tauktae 8 mm of rain recorded Lonavala  
पुणे

'तोक्ते' चक्रीवादळाचा लोणावळ्याला फटका, ८ मिमी पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळा परिसरास 'तोक्ते' चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. गेले दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसाने लोणावळेकरांची तारांबळ उडाली. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने लोणावळ्यात सोमवारी ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर कुमार रिसॉर्टसमोर मध्यरात्रीच्या सुमारास झाड कोसळले. सुदैवाने कसलीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

पुणे- मुंबई महामार्गावर फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा महामार्गावर पडलेले झाड बाजूला बाजूला केले. 'तोक्ते' चक्रीवादळाचा अलर्ट जाहीर झाल्याने नगरपरिषद प्रशासन व महावितरणच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. बाजारपेठ, गवळीवाडा येथे वीज वाहक तारा तुटल्याने काही भागातील वीज पुरवठा विस्कळित झाला.

गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. अनेक नागरिकाच्या पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती बाकी असल्याने पावसाचे आगमन होताच पावसापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.

लोणावळ्यासह कार्ला, कुसगाव बु, वेहेरगाव, मळवली, भाजे, कुसगाव, औंढे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकाची धावपळ उडाली. काही ठिकाणी विजेचे खांब व वृक्ष उन्मळून पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Diwali 2025: दिवाळीत दमा अन् सीओपीडीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT