House Loss Sakal
पुणे

तौक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात १९१ घरांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील १९१ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) पुणे जिल्ह्यातील (Pune District) १९१ घरांचे (House) नुकसान (Loss) झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. यामध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक ९५ घरे आहेत. खेडपाठोपाठ मुळशी तालुक्यातील ७५ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच मावळमधील १०, भोर तालुक्यातील ९, आणि शिरूर व आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका घराचा समावेश आहे. यामुळे ९० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. अन्य तीन नागरिक जखमी झाले आहेत. (Cyclone Tauktae damages 191 houses in Pune district)

याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली आहेत. फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर खोऱ्यात घरांचे नुकसान झाले आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शिरूर तालुक्यात १ घराची पडझड झाल्याने यात २ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. खेड तालुक्यातील घराच्या पडझडीत एक नागरिक जखमी झाला असून, त्यास प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बारामतीतील विद्युत वाहिनीचा धक्का (शॉक) बसल्याने २ शेळ्या व २ मेंढ्या मृत्यू पडल्या. मुळशी तालुक्यातील खांबोली येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले आहेत. ताम्हिणी ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले आहेत. खेड तालुक्यातील दिवेगांव येथील प्राथमिक शाळेचे संपूर्ण पत्रे उडून गेले असून भोरगिरी गावातील ग्रामपंचायत व दोन अंगणवाडीचे पत्रे उडाले असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT