World book of record sakal
पुणे

दगडूशेठ गणपती ट्रस्टचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनतर्फे गौरव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन कडून सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन (स्वित्झरलँड) देऊन गौरव करण्यात आला.

प्रशांत पाटील

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन कडून सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन (स्वित्झरलँड) देऊन गौरव करण्यात आला. कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत ट्रस्टचा सन्मान करण्यात आला. गणपती मंदिरात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने व कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्याकडे सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन सुपूर्द करण्यात आले.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे युरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७० देशामध्ये कोरोना मुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोना मुक्तीसाठी कार्य करण्याकरिता लोकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने विविध संस्थांना सन्मानित करण्यात येत आहे.

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयात गेले अनेक वर्षे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोजनाची सेवा दिली जाते. तसेच कोरोना काळातही रुग्ण व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एकूण १४ लाख ४० हजार भोजन थाळ्या विनामूल्य पुरविण्यात आल्या. त्याचबरोबर ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये सुरवातील ६ रुग्णवाहिकांची सोय व त्यानंतर १० रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली.

जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून मध्य पुण्यातील २७२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून कामाला प्रारंभ केला. पुणेकरांचे सहकार्य मिळविण्यासाठी तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व होम आयसोलेशनसाठी पुणे मनपा प्रशासनाला साहाय्य करणे, नागरिकांना मदत असे विविध कार्य ट्रस्टतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT