Iron hoardings collapse in Pune
Iron hoardings collapse in Pune 
पुणे

पुण्यात जगणं आता खरंच अवघड!

संतोष धायबर

पुणे शहरातील जीवन दिवसेंदिवस धावपळीचं बनत असतानाच आता जीवन जगणं खरंच अवघड होत चालले आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर अपघात, कालवा फुटी, वाडे पडणे, पतंगांच्या दोरीने गळा कापून जीव जाणे, प्रदूषणाच्या विळख्यात श्वास गुदरमणे अशा प्रकारच्या घटनांनी हादरून गेले आहे.

पुणे शहर हे शांत शहर म्हणून ओळखले जात होते. पण, गेल्या काही वर्षांपासून ही ओळख पुसली जाऊ लागली आहे. पुण्याची वाटचाल ही मुंबईच्या दिशेने होत आहे की काय? असा प्रश्न नक्कीच पडताना दिसतो. पुणे शहरातील एखादी व्यक्ती घराबाहेर पडल्यानंतर परत घरी येईल की नाही, हे सांगता न येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

घटना 1:
जुना बाजार चौकामध्ये आज लोखंडी होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. वाहनांमधून प्रवास करत असतानाच अचानक शेवटच्या प्रवास सुरू होतो... मृत्यूने त्यांच्यावर अचानक घाला घातला.

घटना 2:
काही दिवसांपूर्वीच दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सुदैवाने कालवा दिवसा फुटल्यामुळे अनेकांचे जीव तरी बचावले. मात्र, हीच घटना रात्रीच्या वेळी घडली असती तर...

घटना 3:
पुणे शहरामधील वाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, बोटावर मोजण्याइतपत असणारे वाडे अचानक पडतात अन् घटना घडतात...

घटना 4:
पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे "सकाळ'च्या जाहिरात व मार्केटिंग विभागातील महिला कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा गळा कापला गेल्यामुळे मृत्यू झाला.

घटना 5:
पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात नेहमीचेच झाले आहेत. अपघातांमध्ये अनेकांना जीव गमावावा लागत आहे. अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे अनेकांचे आई, बाबा, मुलगा, मुलगी... दुरच्या प्रवासाला निघून जातात.

घटना 6:
पुणे शहरामध्ये रहदारीची अवस्था बिकट होत चालली आहे. अनेकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. वाहनांखाली चिरडून जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना तासन तास प्रदूषणाच्या विळख्यात अडकून पडावे लागत आहे.

पुणे शहरामध्ये एक ना अनेक समस्यांनी तोंड बाहेर काढले आहे. सकाळी घरामधून बाहेर पडलेली व्यक्ती परत घरामध्ये येई पर्यंत काळजी लागते, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. शिवाय, खून, मारामाऱया तर आहेतच. किती तरी घटनांमध्ये निष्पाप जीव जाताना दिसतात. खरंच, पुण्यात जीवन जगणं अवघड होतंय का? असा प्रश्न पडू लागला आहे. यावर तुम्हाला काय वाटते? कशामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे? काय उपाययोजना आखायला हव्यात? काय करायला हवे? याबाबत प्रतिक्रियांच्या माध्यमातून सविस्तर लिहा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT